दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांनी गरिबांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर आणले – देवेंद्र फडणवीस

0

जळगाव ;- जगातील पाचवी अर्थव्यावस्था करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून गरिबांना गेल्या दहा वर्षांत गरिबांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर आणण्याचे काम करून गरिबांचा विकास केला. नरेंद्र मोदी यांनी देशात मोठ्या प्रमाणात रोजागाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या . अर्थव्यवस्थेला आता कुणी थांबवू शकत नाही. विकास पाहून विदेशातून आलेली नागरिक तोंडात बोटे घालत आहे मुंबई आणि पुणे विमानतळासारखी सुसज्ज रेल्वे स्थानक बनली आहेत. नरेंद्र मोदी यांनी जगातल्या १०० देशाना कोरोना लस पुरविली . येत्या पाच वर्षात विकासाची गाडी वेगात जाणार आहे. भारताला सर्वोच्च शिखरावर पोहचण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱयांदा पंतप्रधान करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना केले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,ना. भारती पवार, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन,ना. विजय गावित ,खा. उन्मेष पाटील,खा. रक्षा खडसे , आ. संजय सावकारे,आ. राजूमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, आदी उपस्थित होते.

 

नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा – गिरीश महाजन

जगातील आणि देशातील लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असून त्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. नवं तरुणांनी आगामी निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे हात बळकट कारावेत . तसेच नरेंद्र मोदी यांना तिसऱयांदा पंतप्रधान करा असे आवाहन आज सागर पार्क येथे भाजपच्या युवा संमेलन कार्यक्रमात ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले .

 

Leave A Reply

Your email address will not be published.