समाजसेवीकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आषाढी एकादशीचे औचित्य साधून जळगाव तहसील कार्यालयातील कार्यरत नायब तहसीलदार दिलीप बारी, भुसावळ न्यायालयातील कार्यरत अधीक्षक स्नेहल शुक्ला, यावल न्यायालयातील कार्यरत सहा.अधीक्षक सुनील शुक्ला,  तसेच जिल्हा न्यायालयातील कार्यरत सहा.अधीक्षक कर्मचारी सुनील चौधरी, श्री. बी. जी.नाईक, अनिल बारी आणि ॲड. शरीफ पटेल  यांच्या आर्थिक योगदानातून जळगाव तालुक्यातील  “देऊलवाडे” या छोट्याशा खेडेगावातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता १ ते ४ थी मधील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, पाटी, वह्या, कंपास कीट, वॉटर बॅग, लंच बॉक्स इत्यादी शैक्षणिक साहित्याचे आणि अंगणवाडीतील सर्व बालकांना बिस्किटाचे समाज सेवेच्या स्वरूपात मोफत वाटप करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या आवारातच वृक्षारोपण देखील करण्यात आले.

सदरील कार्यक्रमास शाळेचे केंद्र प्रमुख वैशाली बाविस्कर, मुख्यध्यापक सुरेश बाविस्कर, उपशिक्षक पुनमचंद वंजारी आणि अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास गट शिक्षण अधिकारी पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. सदरील कार्यक्रमास पालकांची आणि गावकऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.