बापरे.. पंतप्रधानांच्या बेडवर आंदोलकांचं WWF (व्हिडीओ)

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

श्रीलंकेत (Sri Lanka) सध्या मोठे संकट निर्माण झालं आहे. दोन कोटी २० लाख लोकसंख्येचे श्रीलंका गेल्या सात दशकांतील सर्वात तीव्र आर्थिक संकटात सापडले आहे. श्रीलंकेत तीव्र परकीय चलन टंचाई निर्माण झाली आहे. इंधन, अन्नधान्य आणि औषधांच्या आयातीवर मर्यादा आली आहे.

सरकार आर्थिक संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याने गेल्या-पाच सहा महिन्यांपासून नागरिक सरकारविरोधात असंतोष व्यक्त करीत आहेत. त्यातच आंदोलकांनी शनिवारी अध्यक्ष आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा ताबा घेतला.

https://twitter.com/SriLankaTweet/status/1546015268790747136?s=20&t=IQx5UcX3EX2jv5vH9cKtPw

अध्यक्ष आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा ताबा घेतल्यानंतर आंदोलकांनी तेथील सुविधांचा लाभ घेत असतानाचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आंदोलक स्विमिंग पूलमध्ये उड्या मारत असून, जीममध्ये व्यायाम करत आहेत. याशिवाय आंदोलक घऱातील बेडवर आराम करत असल्याचेही व्हिडीओ समोर आले आहेत. यादरम्यान पंतप्रधानांच्या निवासस्थानी बेडवर आंदोलक WWF खेळताना दिसत आहेत.

Sri Lanka Tweet या अकाऊंटवरुन व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून यामध्ये काही आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानी बेडवर कुस्ती खेळत असल्याचं दिसत आहे.

अर्थजर्जर श्रीलंकेतील सरकारविरोधी आंदोलकांनी शनिवारी अध्यक्षीय प्रासादाचा ताबा घेतल्यापासून तेथेच ठाण मांडलं आहे. प्रासादातील सर्वच खोल्यांमध्ये निदर्शकांचा वावर असल्याचे व्हिडीओ वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाले आहेत. निदर्शकांनी राजपक्षे यांच्या प्रासादातून कोटय़वधी रुपये जप्त केल्याचा दावा केला. आम्ही हाल सोसत असताना अध्यक्ष मात्र मौजमजा करीत होते, अशी प्रतिक्रिया सरकारविरोधी आंदोलनाच्या नेत्यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.