जळगाव येथे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा

0

लोकशाही न्युज नेटवर्क

राज्यातील राष्ट्रिय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या डॉ.तानाजी सावंत मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी जाहीर केल्याप्रमाणे आशांना ७०००/- आणि गटप्रवर्तक १००००/- रुपये मानधनवाढ देण्याचा शासकीय आदेश (GR) तातडीने काढावा. आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचे सेवानिवृत्तीचे वय निश्चित करून दरमहा पेन्शन लागु करावी. ऑनलाईन कामे तसेच आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड, गोल्डन कार्ड आणि PMJAY फॉर्म ऑनलाईन भरण्याची सक्ती बंद करावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दरवर्षी भाऊबीज भेट लागू करण्यात यावी. गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा. कामाचा मोबदला दरमहा पाच तारखेपर्यंत अदा करावा. आरोग्यवर्धीनीच्या कामाचा थकीत मोबदला देऊन दरमहा लागू करण्यात यावा. मानधनवाढीची थकित रक्कम अदा करण्यात यावी.

या मागण्यांसाठी राज्यांतील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक दि.१२ जानेवारी २०२४ पासुन बेमुदत संपावर गेलेल्या आहेत. परंतु शासनाने आजतागायत सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. म्हणून त्यांच्यात प्रचंड चिड निर्माण झाली आहे.

आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक दि.३१ जानेवारी २०२४ रोजी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा काढणार आहेत. म्हणून सदर दिवशी जिल्ह्यांतील सर्व आशाताई आणि गटप्रवर्तक यांनी ताट(थाळी) तसेच चमचा सोबत आणून थाळीनाद मोर्चात गणवेशात भागिदारी करावी. असे आवाहन कल्पना भोई, भागिरथी पाटील, सुनंदा पाटील, रविशा मोरे, सुनंदा हडपे, सुनीता भोसले, शितल सोनवणे, संगिता पाटील, अर्चना कोळी, माया बोरसे, नम्रता पाटील, अनिता पाटील, भारती नेमाडे, उषा पाटील, भारती तायडे, उषा मोरे आदींनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.