जळगावात क्षुल्लक कारणावरून तरुणावर चाकू हल्ला

0

जळगाव : रस्त्याने जातअसतांना माझ्याकडे काय पाहतो म्हणत तरुणावर सोमनाथ निंबा वंजारी (वय २९, रा. रामेश्वर कॉलनी) यांना मारहाण करीत त्यांच्यावर चाकूने वार केले. ही घटना रविवारी दि. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सिद्धार्थनगरात घडली. या प्रकरणी दादू उर्फ दीक्षांत देविदास सपकाळे व त्याच्यासोबत असलेल्या एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सपकाळे याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.
शहरातील रामेश्वर कॉलनीमध्ये सोमनाथ वंजारी हे वास्तव्यास असून ते मजुरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. वंजारी हे दि. ३१ रोजी सायंकाळच्या सुमारास सिद्धार्थनगर रस्त्यावरून जात असताना तेथे उभ्या असलेल्या दीक्षांत सपकाळे याने माझ्याकडे काय पाहतो असे म्हणत मारहाण केली. त्यावेळी सोमनाथ हे तेथून निघून गेले. त्यानंतर मेहरुण तलावाकडून परत येत असताना दीक्षांत व त्याच्या सोबत असलेल्या एकाने थांबवून पुन्हा मारहाण केली व पोटाजवळ चाकूने वार केले. आमच्या नांदी लागू नको असे म्हणत ते तेथून पसार झाले. जखमी सोमनाथ वंजारी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

हल्लेखोर मेहरुण तलाव परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ संजय धनगर, किशोर पाटील, सुधीर साळवे, ललित नारखेडे, किरण पाटील, साईनाथ मुंडे, छगन तायडे यांनी रात्रीच त्याला अटक केली. हल्लेखोर दिक्षांत हा सराईत गुन्हेगार असून त्याविरुद्ध ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.