राष्ट्रवादीतर्फे आयुक्तांच्या दालनासमोर टाळ वाजवत आंदोलन

0

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी जळगाव महानगर तर्फे निकृष्ट कामांच्या निषेधार्थ व नागरि सुविधांचा अभावामुळे महापालिका प्रशासनाचा विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झोपलेल्या मनपा प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर टाळ वाजवून अनोखे आंदोलन केले.

बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जळगाव शहरातील रस्त्यांचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे चांगले झाले पाहिजे, परंतु सदर रस्त्यांची कामे निष्कृष्ट दर्जाची होत असून या कामांकडे अधिकाऱ्यांकडून लक्ष दिले जात नाही. अनेक ठिकाणी डांबरी रस्त्याचे डांबर हाताने निघत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. रस्त्याचे काम सुरु होण्यापुर्वी स्क्रैपिंग करणे आवश्यक आजांना बिना स्क्रपिंगचे कामे केली जात आहेत. प्रशासनाने वॉटर ग्रेस कंपानीला सफाईचा ठेका दिला आहे तरी देखील शहरात कचरा साफ होत नाहीये महापालिका अधिकारी देखील यावर कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे. नगररचना विभागात बेकायदा बांधकाम परवानगी देण्यात येत आहेत. मेहरुण परिसरातील शिवाजी महाराज स्विमिंग टँक जवळ बेकायदेशिर पणे परवानगी
देण्यात आली अशा तक्रारींचा पाढा वाचून आंदोलकांनी संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी महानगराध्यक्ष
अशोक लाडवंजारी, युवक शहर जिल्हाध्यक्ष रिंकु चौधरी, चिल्हासरचिटणीस वाय.एस. महाजन, महिला अध्यक्ष मंगला पाटील, सहकार सेल जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटील, युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील आदिवासी विकास विभाग, जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, अल्पसंख्यांक सेल महानगरध्यक्ष डॉ रिझवान खाटीक, अॅड. राजेश गोयल, शहर संघटक राजुभाऊ मोरे, सामाजिक न्याय महानगर अध्यक्ष रमेश बान्हे, जिल्हा उप अध्यक्ष किरण राजपूत, अमोल कोल्हे, महानगर जिल्हा उप अध्यक्ष रियाज खाकर, महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील माळी, रहीम तडवी, सुहास चौधरी, महानगर उप अध्यक्ष अनिल पवार, युवक महानगर उपअध्यक्ष चेतन पवार, योगेश साळी, युवक महानगर सरचिटणीस हितेश जावळे, खलील शेख, नईम खाटीक, पंकज तनपुरे, वर्षा राजपूत, कलाबाई शिरसाठ, अल्पसंख्यक उप अध्यक्ष शब्बीर शाह, हारून शेख, विनोद ढमाले, ओबीसी सेल कार्याध्यक्ष रफिक शाह, फै जान खाटीक, मुश्ताक खाटीक, अकबर पठाण पेहलवान, आयाजभाई शाह यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्तेउपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.