जळगावमध्ये जरांगे-पाटीलयांच्या सभेत चोऱ्या करणाऱ्यांना अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटीलयांच्या सभा सातत्याने सुरु आहे. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण जास्त होत आहे. जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने पाच संशयितांना अटक केली आहे. त्यात अबू-बकर-उर्फ कबुतर (वय ३५) या टोळी प्रमुखास त्याच्या चार साथीदारांचा दमावेश आहे.

मौजे कुऱ्हा पानाचे (ता. भुसावळ) गावच्या बसथांबा चौकात श्री. जरांगे-पाटील यांचा सत्कार सोमवारी (ता. ४) करण्यात आला. दुपश्री साडेबाराच्या सुमारास राजू रुपचंद चौधरी यांच्या खिशातील पाकीट चोरीला गेले. साडेपंधरा हजार रुपयांची रोकड पाच तरुणांनी बळजबरीने काढून घेत त्यांना मारहाण केली आणि धमकी देत पळवून लावले आहे.

त्या अनोळखी पाच जणांनी सत्कारावेळी दुसऱ्या एकाच्या खिशातून ६६ हजार रुपयांची चोरी केली. राजू चौधरी यांच्या तक्रारीवरून भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गर्दीत पाकीट, मोबाईल चोरीसह काहींना मारहाण करत लूटमार केल्याची कबुली अटकेतील संशयितांनी पोलिस तपासात दिली आहे.

कार्यकर्त्यांच्या वेशात चोरटे

जरांगे-पाटील यांच्या सभा-मेळाव्यांसाठी मोठी गर्दी होते. मालेगावच्या कबुतर टोळीने अशा ठिकाणी चोऱ्यांचा सपाट लावला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशन नजन पाटील यांच्या पथकाने पोलिसांची धमकी देत अबू-अकबरने आपल्या चार साथीदारांसह मुक्ताईनगर ते पॅरोलदरम्यान प्रत्येक गाव, तालुक्यात पाकीटमार केल्याचे सांगितले आहे. जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात गुन्हे केल्याची माहिती गुन्हे शाखेकडे प्राप्त झाली आहे. इतर जिल्‍ह्यातील पोलिसांशी संपर्क करून माहिती घेतली जात असल्याचे जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.