अल्पवयीन मुलीला अश्लील हातवारे करून तिचा आईवडिलांना मारहाण

0

जळगाव ;- अल्पवयीन मुलीला अश्लील हातवारे केल्याचा जाब विचारायला गेलेल्या तिच्या कुटुंबियांना मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचा प्रकार शाहूनगर परिसरात घडला असून रात्री उशिरा याबाबत जिल्हापेठ पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह एका बांधकामाच्या ठिकाणी राहायला असून या परिसरात राहणारे मित सुनिल पटेल, चेतन सुनिल पटेल हे दोन जण काही दिवसांपासून अल्पवयीन मुलीला अश्लिल हावभावकरून तिची छेद काढत होते. शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही रस्त्याने घरी जात असतांना संशयित मित पटेल आणि चेतन पटेलया दोघांनी तिला बोलावून तिचा हात पकडून विनयभंग केला. पिडीत मुलीने हा प्रकारघरी सांगितल्यावर याचा जाब विचारण्यासाठी पिडीत मुलीचे वडील गेले. याचा राग आल्याने मित पटेल, चेतन पटेल व त्यांचे वडीलांसह त्यांचा एक अनोळखी मित्रांनी पिडीत मुलीच्या वडीलांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच मुलीच्या आईच्या अंगावर विटांनी मारहाण केली. याप्रकरणी रात्री उशीरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मित सुनिल पटेल, चेतन सुनिल पटेल, सुनिल पटेल आणि एक अनोळखी असे एकुण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.