जळगावात रस्त्यांच्या ८३ कोटी कामांच्या निविदांना शासनाकडून मंजुरी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहातील रस्त्यांच्या ८३ कोटी कामांच्या निविदांना शासनाने मंजुरी दिली आहे. नाशिक येथून लवकरच आदेश येतील. आता ही कामे तातडीने सुरु करा असे निर्देश आमदार सुरेश भोळे यांनी आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत दिले. सोमवारी (दि. १६) संध्याकाळी आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्तांच्या दालनात बैठक झाली यावेळी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, माजी नगरसेवक विशाल त्रिवाठी, राजेंद्र घुगे पाटील, उपिस्थत होते. ६

आमदार भोळे यांनी सांगितले की, शहरातील रस्ते कामांच्या निविदांना मंत्रालयातून मंजुरी मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक विभागीय कार्यालयात आदेश आले आहे.

मंगळवारी (ता.१७) हे आदेश जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागात प्राप्त होतील. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग असो की महापालिकेच्या बांधकाम विभागाचे काम असो ती कामे तातडीने सुरू करण्यात यावे. तसेच काही भागात डागडुजी करण्यात यावी.

तसेच वॉटरग्रेसच्या सफाईबाबत लक्ष द्यावे, त्यांच्या बाबत काही तक्रारी आहेत त्याची दखल घ्यावी, अमृत योजनेचे पाणी काही भागात येते तर काही भागात येत नाही. त्याबाबत ताबडतोब पाहणी करावी. तांत्रिक कारणाने काही भागात पाणी पुरवठा होत नसेल तर नागरिकांना त्या भागात लाऊड स्पीकरच्या रिक्षा फिरवून माहिती द्यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.