जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव तालुक्यातील फुपनगरी गावातून एकाच वेळी दोन शाळकरी मुलींचे अनोळखी इसमाकडून अपहरण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी २० सप्टेंबर रोजी सकाळी सडे नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता तालुका पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनुसार, जळगाव तालुक्यातील फुपनगरी गावात वास्तव्यास असलेल्या दोन मुली अल्पवयीन बुधवारी दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शाळेत जाऊन येतो असे सांगून गेल्या. दोघी मुली रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी दोघांचा सर्वत्र शोध घेतला परुंतु दोन्ही मुलींबाबत कोबतीही माहिती मिळाली नाही. दोन्ही मुलींना काही तरी आमिष दाखवत अपहरण केल्याची तक्रार पीडित मुलींच्या नातेवाईकांनी जळगाव तालुका पोलिसात दिली. त्यानुसार गुरुवारी दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केसात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.