guy gift baskets ideas wedding song simple gifts free whopper coupon 2013 blowfish shoes coupon nye importavgifter twix pods discontinued
Thursday, December 1, 2022

खजूर विक्रीच्या माध्यमातून नाथाभाऊंनी दिला कार्यकर्त्यांना रोजगार

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी कृषिमंत्री असतांना शेतकऱ्यांना कमी खर्चात सेंद्रिय शेती करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल ? याकरिता संशोधन करण्यासाठी त्यांच्या शेतात पांढरे जांभूळ, पिवळी खजूर, चिकू, मोसंबी आदी फळांची लागवड केलेली होती. सदर प्रयोग यशस्वी झालेला असुन त्यांच्या शेतातील पिवळी खजूर आज जळगावात विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहेत.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील काही गरजू कार्यकर्त्यांना रोजगार मिळावा, या हेतूने जळगाव शहरात 10 ठिकाणी खजूर विक्री केली जाणार आहे. या खजुराचे बाजारमूल्य 400 रुपये किलो असले तरी कार्यकर्त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी निम्मे किमतीत म्हणजेच फक्त 200 रुपये किलो प्रमाणे खजूर विक्री करण्यात येणार आहे. आज दुपारी चिमुकले राम मंदिर जवळ खजूर विक्री स्टॉलचा शुभारंभ करण्यात आला.

- Advertisement -

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, अमोल कोल्हे, भगवान सोनवणे, रिंकू चौधरी, रहीम तडवी, सुशील शिंदे, नईम खाटिक, संजय जाधव, धवल पाटिल, राहुल टोके, हितेश जावळे उपस्थित होते. लवकरच अजिंठा चौफुली, काव्यरत्नावली चौक, टॉवर चौक, कोर्ट चौक यासह विविध बाजार परिसरात 9 स्टॉल लावण्यात येणार आहेत. या खजुरांची चव साखरेप्रमाणे मधुर असून किंमत देखील कमी आहे तसेच सेंद्रिय शेतीतून पिकलेल्या या खजूरांमध्ये  रासायनिक प्रक्रिया न झाल्यामुळे ग्राहक देखील समाधानी आहेत व त्यामुळेच या खजूर विक्री स्टॉलला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

यापूर्वी लाल खजूर बाजारात उपलब्ध होते पण हे पिवळे खजूर नागरिकांना कुतूहलाचा विषय ठरत आहे. कार्यकर्त्यांना देखील यामाध्यमातून काही प्रमाणात आर्थिक मदत मिळणार असल्याने कार्यकर्त्यांनी देखील याविषयी सकारात्मकता दाखवली आहे व एखाद्या नेत्याने याप्रकारे रोजगार मिळवुन दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या