जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील एका खेडे गावातील १६ वर्षीय मुलीचा दारूच्या नशेत पित्याकडून विनयभंग झाल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने तक्रार दिली, की आई मृत झाल्याने आजी व दोन भावांसह वास्तव्यास असून, इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेत आहे. एप्रिल महिन्यात पित्याने माझ्यासह आजीला शिवीगाळ करून गैरवर्तन केले.
जून महिन्यातही एकांत पाहून शिवीगाळ करून छळ व विनयभंग केला. या प्रकरणाला कंटाळून पीडित मुलीने आजीसह पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी पीडित मुलीच्या पित्याविरद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पोलीस निरीक्षक राहुल खताळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजया वसावे तपास करीत आहे.