बालविकास प्राथमिक विद्यामंदिर येथे पालक सभा संपन्न

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील बालविकास प्राथमिक विद्यामंदिर येथे दि. 22 जुलै 2023 रोजी पालक सभा मोठ्या उत्साहात पार पडली. पालक सभेच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका भारती रामकुवर होत्या. सभेची सुरूवात प्रतिमा पूजन व दिप-प्रज्वलन करून करण्यात आली. अंत्यत खेळीमेळीने पालक व शिक्षक यांच्यात सुसंवाद घडून आला. पालक सभेला मुख्याध्यापिका मातापालक सभेच्या उपाध्यक्षा मनिषा पाटील, सदस्या प्रगती पंजाबी, पालक सभेचे सदस्य महेश पाटील, ज्येष्ठ शिक्षिका सुनिता सुर्यवंशी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका भारती रामकुवर यांनी केले. प्रास्ताविकात विद्यार्थ्यांची गुणवत्ता, मागील शैक्षणीक वर्षाचा आढावा व या शैक्षणीक वर्षातील नियोजन यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका अर्चना खांडेकर यांनी केले तर आभार पूजा पाटील यांनी केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाने उपशिक्षक अमोल सर, विकास झोडगे, सागर महाजन, अंजली सोनवणे, सचिन महाजन पूजा पाटील, रेखा पाटील. व जयश्री सोनजे यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Leave A Reply

Your email address will not be published.