संत शिरोमणी नामदेव महाराज यांची 673 वा संजीवन समाधी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

संत शिरोमणी नामदेव महाराज यांची 673 वा संजीवन समाधी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आणि त्याच्या बाजूला संस्था व महिला मंडळ संयुगी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आज 15 जुलै रोजी वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 673 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते सकाळी शिंपी समाजाच्या मनोरमाबाई जगताप सामाजिक व सांस्कृतिक येथील संत नामदेव महाराजांच्या मंदिर येथून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली सकाळी ९ वाजता मा ना श्री महेशजी ढवळे अध्यक्ष अन्न आयोक मुंबई यांच्या प्रमुख उपस्थित पालखीचे पुजन करण्यात आले.

संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नंथू शिंपी सुनील जगताप, शरदराव बिरारी, आर बी खैरनार याच्या हस्ते आरती करण्यात आली. यानंतर टाळ-मृदुंगाच्या जयघोषात पालखी तेली चौक, राम मंदिर, सराफ बाजार, सुभाष चौक, राजकमल चौक, मार्गे श्री गुरुद्वारा साहेब येथे शिख बांधवांच्या वतीने पालखीचे पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत करण्यात आले. या ठिकाणी ‘संत नामदेव’ तसेच ‘वाहेगुरुजी खालचा वाहेगुरू की फते’ श्री गुरुनानक देवजी यांचा जयघोष करून दोन समाजाचा मिलाप या ठिकाणी झाला. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक या ठिकाणी सर्व समाजाला दिसले. या ठिकाणी शिक बांधवांनी आलेल्या सर्व वारकरी बांधवांचे चहापाणी देऊन त्यांचे स्वागत केले. यानंतर पालखी कुठे येथे बारा वाजता समारोप झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर निकुंभ यांना समाज अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे यांनी त्यांना अध्यक्ष स्थान दिले. प्रमुख अतिथी म्हणून शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हाध्यक्ष बंडू नाना शिंपी, पी टी अन्ना शिंपी, शरदराव बिरारी रविकिरण, कोबंडे साहेब, आणि सुभाष चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या ठिकाणी अभिजीत किरण सोनवणे, मनोज भंडारकर, अश्विनजी गांधी, यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या ठिकाणी समाजाच्या वतीने मागणी सादर करण्यात आली. गुजरात पेट्रोल येथील सर्कला व उड्डाणपुलाला संत नामदेव गुरूनानक देव नाव देण्याचा प्रस्ताव सादर केला. यावर महापौर जयश्री महाजन, उपमहापौर व कुलभूषण पाटील, आ राजुमामा यांनी सर्वानुमते संमती दर्शवली.

संस्थेच्या माध्यमातून पूज्य साने गुरुजी शिष्यवृत्ती योजना जाहीर केली व या योजनेअंतर्गत पवन शिंपी यास आज 11000 रुपयाचा चेक प्रदान केले. यानंतर शिंपी समाज प्रीमियर लीग एस.पी. एल. थ्री चे लॉन्चिंग सुमित राव यांनी केले. तसेच संस्थेच्या लोगोचे सुद्धा विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणून महिला मंडळाच्या वतीने सुंदर टाळ मृदुंगाच्या तालावर सुरेख नृत्य सादर केले. या नृत्याने नागरिकांचे मन आकर्षित केले होते. सचिव देखाव्यात विठ्ठल रुक्मिणी नामदेव महाराज याचे सजीव देखाव्यात समर्थ शिंपी रिवांश भांडारकर व उन्नती शिंपी यानी केले होते. युवक मंडळातर्फे भव्य वृक्षारोपण व रक्तदानाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हितवर्धक संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकारी सदस्य निमंत्रित सदस्य युवक मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी सर्व शाखांचे अध्यक्ष महिला मंडळ अध्यक्ष महिला कार्यकर्त्या व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी अडीच हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अनिल आणि चेतन व मनोज भंडारकर यांनी केले. आभार प्रदीप शिंपी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.