शोध शिक्षणासह माणसांचा” पुस्तकाचे प्रकाशन

0

जळगाव ;- शिक्षण हा ज्ञानरूपी यज्ञ असल्याने हा यज्ञ कायम प्रज्वलित रहावा यासाठी पुस्तक प्रकाशन हे एक माध्यम आहे माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो या भूमिकेतूनच आपल्याला पाल्यांवर योग्य ते संस्कार केले जातात म्हणून या यज्ञाला वाचनाच्या माध्यमातून आपण तेवत ठेवले पाहिजे असे विचार के. सी.ई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांनी शोध शिक्षणासह माणसांचा या पुस्तक प्रकाशनावेळी मांडले.
यावेळी व्यासपीठावर ए.टी झांबरे शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, गुरुवर्य प्राथमिक विद्यामंदिराच्या माजी मुख्याध्यापिका रेखा पाटील, मुख्याध्यापिका धनश्री फालक, अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी, संगीता माळी सुनिता भंडारी आदी उपस्थित होते.

पुस्तक परिचय व पुस्तकाचे प्रकाशन रेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . शालेय समन्वय चंद्रकांत भंडारी लिखित शिक्षणासह शोध माणसांचा या पुस्तकाच्या प्रास्ताविकेत भंडारी यांनी सांगितले की, आजच्या बदलत्या काळात पालक आणि मुलांमधील हरवलेला संवाद वाढला पाहिजे यासाठी पालकांनी मुलांना समजून घेतले पाहिजे. चांगल्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे, असे विचार त्यांनी प्रास्ताविकात मांडले. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक बंधू भगिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले..

Leave A Reply

Your email address will not be published.