उष्माघातापासून संरक्षण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करावेत जिल्हाधिकारी- अमन मित्तल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

वातावरणातील विशेष बदलांमुळे उन्हाळी हंगामात वाढत्या तापमानामुळे जळगाव जिल्ह्यात उष्मा लाट प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो दिनांक 13 व 14 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी संयुक्तरीत्या आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत उष्माघात उपाययोजनांसाठी स्थानिक स्तरांवर नियोजनाची सूचना दिलेली आहे. जिल्ह्यातील भौगोलिक व वातावरणीय बाबींचा विचार करून याबाबतचे नियोजन करणे आवश्यक आहे. याकरिता प्रत्येक विभागाने त्यांच्या आवश्यकतेनुसार नियोजन व आराखडा तयार करणे महत्त्वाचे ठरते. तापमानाचा निकषानुसार सलग दोन दिवस डोंगरी भागात 30 डिग्री सेल्सिअस समुद्र किनारपट्ट्यात 37 डिग्री सेल्सियस हंगामातील सामान्य तापमानापेक्षा 4.5 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमानाची वाढ होणे यापैकी कोणतीही एक नोंद राहणे अत्यावश्यक आहे. सदर भागांमध्ये उष्णतेची लाट आहे असे समजून त्यामुळे होणाऱ्या परिणामाला सामोर जाण्यासाठी दक्षता ठेवणे आवश्यक आहे.

उष्माघातापासून संरक्षण मिळण्यासाठी केलेले उपाय खालील प्रमाणे

शहरात जास्त उष्णतेमुळे शाळा एक वाजेपर्यंत करण्यात आली आहे सोबतच, पीडब्ल्यूडी सारख्या सर्व एरियामध्ये शेड निर्माण केले गेले आहे. मान्सून पुढे ढकलण्याची शक्यता असून त्यावर उपाययोजना म्हणून शेतकरी बांधवांना बियाणे, पाण्याची सोय करून देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पाण्याचा नासाडा होत असेल त्या ठिकाणचे लिकेज लवकरच सुधारण्यात येणार आहे. धरणातील पाणी चोरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल सोबतच अमृत योजनेच्या नळांना मीटर बसवण्यात येणार असून ऑटोमॅटिक व्हॉल्व बसविण्यात येणार आहे, जेणेकरून पाण्याची नासाडी होऊ नये. लवकरच गाळ काढण्याची मोहीम शहरात राबविण्यात येणार आहे त्याचप्रमाणे सर्व नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी वाचवण्याचा सल्ला दिला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.