सादरीकरणाची रक्कम मिळण्यात दिरंगाई का?

राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी संस्थांनी उपस्थित केला सवाल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनायाच्या वतीने दरवर्षी हौशी राज्यनाट्य स्पर्धा, तसेच बालनाट्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेची प्राथमिक फेरी ही प्रत्येकवर्षी प्रमाणे यंदाही नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पार पडली. त्याच बरोबर सदर स्पर्धांची अंतिम फेरी देखील पार पडली आहे. मात्र असे असूनही यास्पर्धेसाठी संचालनायाच्या वतीने दिला जाणारा सादरीकरणाचा खर्च हा मिळण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे कलावंतांसोबतच नाट्यसंस्थांद्वारे रोष व्यक्त करण्यात येत आहे. राज्यभरात १९ केंद्रांवर ही स्पर्धा पार पडते. आणि यामध्ये दरवर्षी हजारोंच्या संख्येने कलावंत आपली कला सदर करत असतात. मात्र शासनाच्या अश्या ढिसाळ कामगिरीने उत्साही कलावंतांचा हिरमोड होतो.

 

मिळणारी रक्कमही नाममात्र…
संचालनायाच्या वतीने दिली जाणारी रक्कम फार मोठी नसून नाममात्र फक्त सहा हजार रुपये मात्र एवढीच आहे. तरीही शासनाचा याकडे कानाडोळा का होतो या सावत्र व्यवहारामुळे कलावंत कमालीचे हैराण आहेत. महाराष्ट्रात नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुका असल्याने सर्वांचे लक्ष तिकडेच आहे का ? हा सवाल उपस्थित होतो. मात्र नाट्यसंस्था हवालदिल त्यांचा कोणी वाली नाही का ? संबंधित अधिकार्याशी चर्चा केली असता कामगारांचा संप संपला कि, त्यानंतर ३१ मार्च पर्यंत होईल, पुन्हा विचारले असता १० एप्रिल ला नक्की मात्र ११ एप्रिल गेली तरीही कसलीच हालचाल नसल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.