शिक्षणाची ज्योत अंतरी तेवत ठेवा – प्रा. रंजना सोनवणे

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो, मूल्यशिक्षणाची जडणघडण त्याच्या अंगी निर्माण होते. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने शिक्षणाची ही ज्योत अंतरी तेवत ठेवली पाहिजे असे विचार प्रा. रंजना सोनवणे यांनी मांडले.
के. सी.ई सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त “जोतिबांचे विचार आणि आचार” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थी संवादात प्रा. रंजना सोनवणे यांनी सांगितले की,जोतिबा यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य खूप मोठे आहे. त्यांचे आचार आणि विचार प्रत्येक विद्यार्थ्यांने आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. प्रा.सोनवणे यांनी प्रतिमा पुजन करीत माल्यार्पण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, आयोजन, व आभार प्रा.डॉ. शैलेजा भंगाळे यांनी केले. प्रा. शैलजा भंगाळे यांनी प्रास्ताविकात जोतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
यावेळी गायत्री शिंदे, मानसी ठोके या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रा.स्वाती चव्हाण, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.