वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वर्धापनदिनी आयएमए जळगावतर्फे समर्पण दिन उपक्रम

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (World Health Organization) 75 व्या वर्धापन दिनानिमित्त यावर्षीच्या सर्वांसाठी आरोग्य या संकल्पनेनुसार आयएमए जळगावच्या वतीने काव्यरत्नावली चौकात दिवे प्रज्वलित करून आदरांजली अर्पित करीत समर्पण दिनाचा उपक्रम करण्यात आला. रुग्णांच्या सेवेसाठी निस्वार्थ वृत्तीने व समर्पित भावनेने जीवनकार्य करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना आदरांजली म्हणून हा समर्पण दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जनतेला गुणवत्तापूर्ण व सुरक्षित आरोग्य सेवा मिळावी म्हणून डब्ल्यूएचओने (WHO) 2023 या वर्षासाठी सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना दिली आहे. कार्यक्रमास आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. सुनील नाहाटा, सचिव डॉ. तुषार बेंडाळे, एचबीआयचे राज्य चेअरमन डॉ. अनिल पाटील, राज्य कोषाध्यक्ष डॉ. स्नेहल फेगडे या मान्यवरांसह आजी-माजी पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी आयएमएच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.