मागण्या पूर्ण करण्यासाठी कमर्चाऱ्यांचे निदर्शने

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी निदर्शने केली जात आहे. तसेच बांधकाम कामगार, घरगुती कामगार व आशा वर्कर्सच्या विविध मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. केंद्र सरकारने रद्द केलेले ४४ कामगार कायदे पूर्ववत अंमलात आणावेत, चार श्रम संहिता रद्द करावी, आशा व गट प्रवर्तकांना आरोग्य विभागाने शासकीय कर्मचारी म्हणून कायम सेवेत घ्यावे, आशा व गट प्रवर्तकांना किमान वेतन कायदा लागू करावा, शेतमाल उत्पादन खर्चावर आधारित भाववाढ द्यावी आदी मागण्यांसाठी ‘सीटू’च्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी कॉ.विजय पवार, ताराबाई महाजन, रेखा वाणी, बबीता पाटील, छायाबाई बिरारी, प्रतिभा काळे, जगदीश कोळी, चंदा एकशिंगे, रफिक मिस्तरी, भगवान कोळी, दुर्गाबाई गवळी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.