बापरे!…गेल्यावर्षाच्या तुलनेत जलसाठा कमी झाल्याचे दिसून आले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

जळगावचा उन्हाळा सर्वांचं चांगल्याप्रकारे ज्ञात आहे. असह्य उन्हामुळे जळगावकरांचे हाल हे दरवर्षी होतातच पण त्यापेक्षाही पाण्याच्या कमी साठ्यामुळे नागरिकांचे जास्त हाल होतात. आणि आता ह्या वर्षी जलसाठा कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील १३ जलप्रकल्पातील साठा गतवर्षाच्या तुलनेत कमी आहे. या प्रकल्पांपैकी केवळ गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्यात आली आहे. यंदा मार्च महिन्यात तापमान नसतानाही प्रत्येक प्रकल्पातील जलसाठा कमी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

२८ मार्च २०२२ आणि २८ मार्च २०२३ या जलसाठ्याची आकडेवारी पाहता गेल्यावर्षाच्या तुलनेत साठा कमी झाल्याचे दिसून येत आहे. यंदा गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्यात आली आहेत. त्यामुळे गिरणा धरणातील जलसाठा कमी होणे अपेक्षित आहे. मात्र हतनूर, वाघूरसह अन्य प्रकल्पांतील जलसाठा सुरक्षित असतानाही यंदा तो कमी झाल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.