समाजकार्य महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी थिरकली तरुणाई

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

‘धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव’ येथील वार्षिक स्नेहसंमेलन 2022-23 चे आयोजन दिनांक 3 व 4 मार्च 2023 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी समाजकार्य महाविद्यालयाचे स्नेहसंमेलनाचे दिनांक 2 मार्च 2023 रोजी प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघ वाघुळदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. समाजकार्य महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघोदे हे उद्घाटक म्हणून प्रमुख अतिथी होते. तसेच डॉ.राकेश चौधरी हे स्नेहसंमेलन उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुचिका इंगळे हिने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जुगल घुगे स्नेहसंमेलन प्रमुख यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर कल्पना भारंबे यांनी केले.

उद्घाटकीय भाषणामध्ये प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघुळदे यांनी तरुणांना मिळणारे स्नेहसंमेलन हे एकसर्वांगीण विकासासाठी योग्य असे विचार मंच असून या विचार मंचातून अनेक कलाकार तयार होत असतात, ही संधी तुम्हाला सुद्धा आहे. महाविद्यालयाच्या अनेक प्रसंगातून आणि अभ्यासातून किंवा इतर गोष्टीतून विरंगुळा मिळावा हा त्याचा प्रमुख उद्देश असतो. अध्यक्ष भाषणामध्ये डॉक्टर राकेश चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की, समाजकार्य महाविद्यालयाचा जागर वार्षिक स्नेहसंमेलन हे इतर शाळा महाविद्यालयातील स्नेहसंमेलनापेक्षा निश्चितच वेगळे असते.

दिनांक 2 मार्च 2023 या दिवशी समाजकार्य महाविद्यामध्ये रांगोळी स्पर्धेचे आणि मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक सामाजिक विषयावर आधारित रांगोळी काढल्या. त्यानंतर दिनांक 3 जानेवारी 2023 या दिवशी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा दिन साजरा केला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी दक्षिणात्य सांस्कृतिक वेशभूषा, महाराष्ट्रातील वेशभूषा, तसेच इतर सुद्धा वेशभूषा त्यांनी धारण केल्या होत्या. त्यामुळे महाविद्यालय सहभागी विद्यार्थीअतिशय उत्साही आणि आनंदी दिसले.

दिनांक 4 मार्च 2023 रोजी फॅन्सी ड्रेस, वैयक्तिक नृत्य, जोडी नृत्य, समवनृत्य गीत गायन या स्पर्धा झाल्या पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माननीय योगेश पाटील (आयुक्त सामाजिक न्याय विभाग जळगाव) डॉ.विनोद पाटील (कुलसचिव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव ) कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बी आर चौधरी, डॉक्टर पी. आ. चौधरी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले. सुनील पाटील, डॉ.विनय पाटील यांनी विशेष उपस्थिती दिली

पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी विचार मंचावर डॉक्टर पी. आर. चौधरी अध्यक्षस्थानी होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील कलासचिव डॉक्टर विनोद पाटील, तसेच जळगाव येथील आयुक्त योगेश पाटील, सुनील पाटील, डॉक्टर विनय पाटील, डॉक्टर जुगल घुगे स्नेहसंमेलन प्रमुख डॉक्टर कल्पना भारंबे हे विचार उपस्थित होते. तसेच प्रा. अशोक हनवते यांनी तर्फे आयोजित असलेल्या फाउंडेशन ट्रस्ट द्वारे प्राप्त झाला तसेच महाविद्यालयाच्या उपयुक्तते साठी ‘क्षेत्र कार्य प्रशिक्षण आणि समाजकार्याची कौशल्य’ हे पुस्तक प्रकाशित केले. यासोबत प्रोफेसर जॉन पॉल आणि ऑस्ट्रेलियाचे नऊ विद्यार्थ्यांनी भेट दिली. सोबतच डॉक्टर विनोद पाटील कुलसचिव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर कल्पना भारंबे यांनी केले. तसेच आपल्याला मिळणाऱ्या पारितोषिकांची आणि या पारितोषिक वितरण समारंभामध्ये ज्यांच्या शुभहस्ते आपल्याला हे पारितोषिक मिळणार आहे. माननीय प्राचार्य यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थान स्वीकारलं त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आणि प्राध्यापकांच्या वतीने आपले आभार मानते.

Leave A Reply

Your email address will not be published.