जळगाव जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागानेही उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल केला प्राप्त

0

मागच्या आर्थिक वर्षातील महसूल 25.10 कोटी तर यावर्षी 29.78 कोटी, 18 टक्यांनी वाढले

जळगाव  :- जळगाव जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागानेही उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल प्राप्त केला असून 2022-23 या आर्थिक वर्षात 25 कोटी 10 लाख रुपये होता तो वाढून यावर्षी 29 कोटी 78 लाख एवढा झाला आहे. गतवर्षाच्या तुलनेत महसुलात 18 % वाढ झालेली असून सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिताचे उद्दीष्ट 28.51 कोटी पेक्षा जास्त महसूल प्राप्त झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांनी दिली.
यात प्रामुख्याने नवीन अनुद्यप्ती मधून मिळणारे शुल्क, नुतनीकरण शुल्क, परदेशातून आयात मद्यावर लागणारे विशेष शुल्क आणि दंड वसुली मधून मिळालेले महसूल असल्याचे सांगून 28.51 कोटी एवढे वार्षिक उद्दिष्ट होते. ते उद्दिष्ट पार करून 29 कोटी 78 लक्ष एवढा महसूल प्राप्त झाला आहे. यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वेळोवेळी घेतलेला आढावा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील इतर अधिकारी वर्गाचे सहकार्यमिळाल्याचे डॉ. व्ही टी. भुकन यांनी सांगितले.

हातभट्टी वर प्रभावी कारवाई
जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत एकूण 2025 गुन्हे नोंदविले असून 4 कोटी 17 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करत उच्चांकी कामगिरी केली आहे. या कालावधीत महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या कलम 93 नुसार सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत उपविभागीय दंडाधिकारी यांच्या मार्फत चांगल्या वर्तणुकीचे 234 बन्धपत्र घेण्यात आले. जिल्ह्यात हातभट्टी वर नियंत्रण मिळवण्याचा एक भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रथम च MPDA कायदा 1981 नुसार 2 गुन्हेगाराना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने अनुक्रमे अमरावती व नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
00000

Leave A Reply

Your email address will not be published.