शेतीमध्ये विद्यार्थ्यांची रुची वाढावी हा ‘फाली’मागच्या आयोजनाचा उद्देश – अनिल जैन

0

फालीचे विद्यार्थ्यांनी केले बिझनेस प्लानचे सादरीकरण ; (पहा व्हिडीओ )

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

भारत हा शेती प्रधान देश असून ५० टक्के अर्थात ७० कोटी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये फालीची सुरुवात करण्यात आली असून आता मध्यप्रदेशात सुरु करण्यात येणार आहे. शेतकरी म्हटला म्हणजे आत्महत्या करणारा असा समज आहे. शेतकरी आपल्याच पाल्याना शेतीत काय आहे असे सांगून इतर क्षेत्रात शिक्षण घ्यायला सांगणारे बहुसंख्य आहेत. त्यामुळे विद्यार्थयांमध्ये शेतीविषयी रुची निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश असल्याचे प्रतिपादन जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष व फाली असोसिएशनचे चेयर पर्सन अनिल भाऊ जैन यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केले. याप्रसंगी गोदरेज ऍग्रीवेटचे कार्यकारी संचालक बुर्जिस गोदरेज, स्टार ऍग्रीचे चेअरमन बी.बी पटनायक, फाली असोसिएशनच्या व्हॉइस चेयर पर्सन नॅन्सी बेरी, फाली च्या डीजीएम रोहिणी घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अनिल जैन म्हणाले कि, ‘फालीच्या माध्यमातून २०३० पर्यंत अर्थात १७ वर्षांच्या काळात अडीच लाख विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले जाणार आहे. शेती व्यवसाय मी करू शकतो हि संकल्पना रुजवणे महत्वाचे आहे. सध्या फली चे हे दहावे वर्ष असून या उपक्रमाला विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. विद्यार्थी यातून शेतीमध्ये संकल्पना ,भविष्य , भवितव्य काय आहे हे विचार करतात.

फ्युचर लीडर्स ऍण्ड ऍग्रीकल्चर या संकल्पनेतून शेतीत लीडरशिप तयार करण्याचे काम सुरु आहे. यासाठी फंडिंग करण्यात येणार असून येत्या दहाव्या वर्षात चांगले काम होत असून ते आणखी वाढणार असल्याचा विश्वास अनिल जैन यांनी व्यक्त केला . ग्रामीण भागातील शांमध्ये शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांचा सहभाग यात आवश्यक असून ग्रामीण शांमध्ये त्याला वाव असल्याचे श्री जैन यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना अनिल जैन म्हणाले कि, कोरोना काळात शेतीमुळेच आपला देश वाचला. शेतीमध्ये विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेती केली गेली पाहिजे. फलीच्या माध्यमातून विद्यार्थ्याना प्रात्यक्षिक चे प्रशिक्षण दिले जाते. हा खासगी उपक्रम असून इतर कंपन्यांच्या सहकार्याने हा सुरु आहे. यात केंद्र अथवा राज्य शासनाचा सहभाग नसल्याचा खुलासा करून विद्यार्थाना लीडर्स बनविणे हा उद्देश असल्याचे अनिल जैन यांनी सांगितले. शेतीमध्ये विद्यार्थ्याचे भविष्य उज्ज्वल असून त्यांनी अधिकाधिक प्रगत शेतीकडे वळावे असे मत फाली असोसिएशनच्या व्हॉइस चेयर पर्सन नॅन्सी बेरी यांनी व्यक्त केले. अर्थात शेतीकडे वळावे कि नाही ते त्यांच्या आवडी निवडीवर अवलंबुन असल्याचे सांगितले.

बिझनेस प्लॅनचे विद्यार्थ्यांकडून सादरीकरण
दुसऱ्या दिवशी ५ जून रोजी जैन हिल्स येथील विविध सभागृहात सकाळी ८.०० ते १०.३० दरम्यान फालीचे विद्यार्थ्यांनी आपले बिझनेस प्लॅन सादरीकरण केले. . शेती विषयक नाविन्यपूर्ण संशोधन व संकल्पनेचे स्टॉल्स जैन हिल्स येथील आकाश ग्राऊंड येथे मांडण्यात आले होते . विद्यार्थ्यानी स्वतः विकसीत केलेल्या इन्होव्हेशन्सची माहिती विद्यार्थी देत होते. या उपक्रमांची माहिती आणि पाहणी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.