काय सांगता? इंग्रजी बोलल्यास भरावा लागणार दंड !

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

इतर देशात असो व आपल्या भारतात, आपली मातृभाषा सोडून आपण इंग्रजीवर जास्त भर देतो. इंग्रजी बोलता येत नाही म्हणून आपण स्वतःला कमी लेखत असतो. पण आता इटालियन (Italian) सरकारने एक मोठ्ठा निर्णय घेतला आहे. इटालियन सरकार (Italian Government) लवकरच इंग्रजी (English) आणि इतर परदेशी भाषांवर (Foreign language) बंदी घालणार आहे. याअंतर्गत नागरिकांकडून चूक झाल्यास मोठा दंड आकारण्यात येणार आहे. इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Italian PM Giorgia Meloni) यांनी एक नवीन कायदा आणला आहे, ज्यामुळं अधिकृत संभाषणात कोणतीही परदेशी भाषा, विशेषतः इंग्रजी बोलल्यास 100,000 युरो (सुमारे 89 लाख रुपये) पर्यंत दंड होऊ शकतो.

इटालियन चेंबर ऑफ डेप्युटीजमध्ये फॅबियो रॅम्पेली यांनी पंतप्रधानांच्या या कायद्याला समर्थन दिलंय. इटालियन सरकारनं सादर केलेला हा कायदा परदेशी भाषांबाबत आहे. विशेषतः अँग्लोमॅनिया किंवा इंग्रजी शब्दांच्या वापरावर आधारित आहे. जॉर्जिया सरकारच्या मते, ‘इंग्रजी किंवा परदेशी भाषा इटालियन भाषेची निंदा आणि अपमान करते.

Leave A Reply

Your email address will not be published.