गोदावरी फाऊंडेशन व तालुका आरोग्य विभागातर्फे आशा दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

गोदावरी फाऊंडेशन आणि जिल्हा परिषद जळगाव च्या जळगाव ग्रामीण तालुका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ३१ मार्च रोजी आशा दिवसानिमित्त आशा गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रांगोळी, गीत गायन, नृत्य, नाटिका सादर करण्यात आल्यात.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ उल्हास पाटील हे होते. त्यांच्यासमवेत व्यासपीठावर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, मेडिकल अधिकारी डॉ प्रेमचंद पंडित यांच्यासह जिल्हा परिषद चे आरोग्य अधिकारी डॉ सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ चव्हाण, डॉ बडगुजर आदी उपस्थित होते. दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आशा सेविकेने गणेशवंदना सादर केली. मान्यवरांच्याहस्ते उत्कृष्ठ काम करणार्‍या आशा सेविका व गटप्रवतिकांचा सन्मान प्रातिनिधीक स्वरुपात करण्यात आला. सत्कारमुर्तींना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांनी आपल्या भाषणांद्वारे आशा सेविकेंचे महत्व सांगत आशा दिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रमाच्या पहिल्याच्या टप्प्यात डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील निवासी डॉ.निलीजा बिर्‍हाडे, सर्जरीच्या निवासी डॉ.सेजोल कश्यप, डॉ.आचल यांनी आशासेविकांना मार्गदर्शन केले. आजार, त्याचे स्वरुप, डॉक्टर करीत असलेले उपचार, योजनांची माहिती याची सविस्तर माहिती पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे सादर करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.