जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात “टेक्नोरीओन – २०२३” चे आयोजन

0

 

देशातील विविध महाविद्यालयातील ३८० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ; तांत्रिक कलांचा आविष्कार

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे दर्शन घडविणाऱ्या राष्ट्रीयस्तरीय “टेक्नोरीओन – २०२३” चे जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात मोठ्या उत्साहात हा उपक्रम संपन्न झाला. ता. ३१ मार्च व १ एप्रिल रोजी या राष्ट्रीय स्तरावरील “टेक्नोरीओन” या स्पर्धेचे आयोलन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांचे स्वयंसंशोधीत नवनविन उपकरणांचे मॉडेल्स, प्रोजेक्‍ट एक्झ‌िक्यूशन व रोबोटीक्स याचे प्रमुख आकर्षण होते. दरवर्षाप्रमाणे यंदाही टेक्नोरीओन हा इव्हेंट घेण्यात आला असून यामध्ये १५ च्यावर अभ‌ियांत्र‌िकी महाविद्यालयातून ३८० हून अध‌िक विद्यार्थी सहभागी झाले. या उपक्रमाच्या समारोप कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाचे सचिव महेंद्र चीतलांगे, रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, उपसंचालक व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा व अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री. चीतलांगे यांनी नमूद केले कि, विध्यार्थ्यानो कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा तेव्हाच तुम्ही जीवनात यशाचे शिखर गाठू शकाल धैर्याने पाऊल उचलत चला. बंडखोरी वृत्ती जागवा आणि आपल्या कम्फर्ट झोनचा विस्तार करत पुढे जा. नेहमी कम्फर्ट झोनमध्ये राहिलात तर तुमचे यश त्या कक्षांना कधीही भेदू शकणार नाही. तुम्हाला कम्फर्ट झोनच्या भिंती पाडाव्याच लागतील आणि जीवनात यश शिखर गाठावे लागेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने या उपक्रमाचे सलग पंधरावर्षांपासून महाविद्यालयातर्फे आयोजन केले जाते.

कॉलेज म्हटलं की धम्माल-मस्ती ही आलीच. परंतु या धम्माल मस्तीला जर कॉलेजिअन्सच्या स्‍मार्ट अॅटीट्यूडची जोड मिळाली तर सोन्याहून पिवळे. सध्या इन्फॉरमेशन अन् टेक्नोलॉजीचे वारे जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये घुमत आहे. या इव्हेंटसाठी उपसंचालक व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा व अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांच्या मार्गदर्शनाखाली मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख मुकुंद पाटील, सिव्हील अभियांत्रिकी विभागप्रमुख शंतनू पवार, प्रा. सोनल पाटील, प्रा. बिपासा पात्रा, प्रा. प्रमोद गोसावी, प्रा. जितेंद्र वडद्कर, प्रा. तुषार वाघ, प्रा. विशाल तेली, प्रा. अमोल जोशी, प्रा. योगेश वंजारी, प्रा. रामकांत पाटील, प्रा. पवन धोने, प्रा. सौरभ नाईक, प्रा. पल्लवी सुरवाडे, प्रा. वसीम पटेल, प्रा. मयूर जाखेटे, प्रा.मनीष महाले प्रा. गौरव धारसे, प्रा. स्वाती पाटील, प्रा. शुभम घोष, प्रा. प्रेम आर्या, प्रा. शीतल जाधव, प्रा.साई चेतन्य, प्रा. स्वाती बाविस्कर, प्रा. सुवर्णा आवटे या महाविद्यालयातील प्राध्यापकांसह विध्यार्थ्यानी परिश्रम घेतले.

 

तांत्रिक कलांचा आविष्कार

“टेक्नोरीओन” या इव्हेन्ट दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील प्रोफेशनल आयुष्यात ज्या गोष्‍टींना सामोरे जायचे आहे त्याच अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात स्पार्क इलेक्ट्रा फेस्ट ही स्पर्धा घेण्यात आली. यात टेक्नो अंताक्षरी, टेक्नो हंट, लोगो डिझाईन, लुडो, चेस, इ. गेमिंग, सर्किट मिनिया तसेच टेक्नीकल क़्विज या विविध स्वरूपाच्या स्पर्धा येथे घेण्यात आल्या. प्रोजेक्ट एक्झ‌िब्युशनमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले प्रोजेक्ट व पोस्टर हे तज्ञ मंडळीसमोर सादर करण्यात आले. तसेच रोबोरेस स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या रोबोमध्ये एका लाकडी ट्रॅकवर रेस लावण्यात आली.

 

या विध्यार्थ्यानी मिळविले यश

ई गेमिंग या स्पर्धेत रिझवान खान, सुमित राजपूत, अथर्व धाकड, मयूर चौधरी व अमित तायडे टेक्नोप्रणर या स्पर्धेत सोहेल हमीद कच्ची, कॅडेन्गर या स्पर्धेत शुभम बोरसे, आयडीथाॅन या स्पर्धेत सोहेल कच्ची, रोबोरेस या स्पर्धेत गौरव महाजन, नयन पाटील, वंश येवले, टेक्निकल क़्विज हर्षदा सावकारे, मयूर पाटील, टाऊनस्केपर या स्पर्धेत ओम शेवाळे, कुणाल पाटील, दुर्गेश कापडणीस व परेश पाटील, टेक्नो अंताक्षरी या स्पर्धेत मयूर कोळी, तेजस पाटील, लोगो डिजाईन यात किरण बोदडे, दीपक इंगळे, सीएस या स्पर्धेत चंदन भटू पार्थ धम्मरत्ने, एनएफएसमध्ये योगेश महाजन व लुडो स्पर्धेत हेतल पाटील, पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत दीक्षा पाटील, प्राची चव्हाण, गुंजन सोनार, जानव्ही रायसिंग, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन सर्वेश चौधरी, देवयानी फालक, वैष्णव चौधरी, नरेंद्र महाजन, सोमा रामटेके, मयूर देपुरा

Leave A Reply

Your email address will not be published.