इस्रायलचा गाझामध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनींना २४ तासांच्या आत काढण्याचा इशारा

0

जेरुसलम ;- इस्रायल (Israel) गाझा परिसरात सातत्याने हवाई हल्ले करत आहे. यासोबतच इस्रायलने (Israel) संयुक्त राष्ट्रांना गाझामध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनींना २४ तासांच्या आत तेथून बाहेर काढण्यास सांगितले आहे. तर याला आता संयुक्त राष्ट्राने उत्तर दिले आहे.

इस्रायलने (Israel) संयुक्त राष्ट्राला दिलेल्या इशाऱ्यानंतर आता संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्याने, “या भागात 10 लाखांहून अधिक लोक राहतात. ही गाझाची लोकसंख्या निम्मी आहे. इस्रायलने हा आदेश मागे घ्यावा,” असे आवाहन संयुक्त राष्ट्रांनी केले आहे. तसेच इस्रायल ज्या 11 लाख लोकांना हा परिसर सोडण्यास सांगत आहे ते गाझाच्या संपूर्ण लोकसंख्येच्या 50 टक्के आहेत.

संयुक्त राष्ट्राने म्हटले की, “अशा प्रकारचे लोकांचे स्थलांतर अशक्य आहे, जर असे केले तर मानवतेला रोखावे लागेल, त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.” उल्लेखनीय आहे की इस्रायलने (Israel) गाझा परिसरात सुमारे 3 लाख राखीव दल तैनात केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हवाई हल्ल्यांव्यतिरिक्त इस्रायल ग्राउंड ऑपरेशनचीही तयारी करत आहे. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने(Israel) गाझा सीमेवर रणगाडे आणि तोफखाना तैनात केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

इस्रायली (Israel) राजदूताने उत्तर गाझा रिकामे करण्याच्या इस्रायलच्या आदेशाला संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिसादावर आक्षेप व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्रातील इस्रायलचे (Israel) राजदूत गिलाड एर्डन यांनी म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्राची प्रतिक्रिया ‘लज्जास्पद’ आहे. ते म्हणाले की, इस्रायलला गाझातील लोकांना आधी सावध करायचे आहे आणि हमासविरुद्धच्या कारवाईत निष्पापांचा मृत्यू होऊ द्यायचा नाही.

दरम्यान, हमासच्या हल्ल्यात 1,300 हून अधिक इस्रायली (Israel) लोकांचा मृत्यू झाला आहे, तर गाझावरील इस्रायलच्या(Israel) प्रत्युत्तरादाखल कारवाईत 1,500 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. विदेशी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझामधील 6 दिवसांत 22 हजारांहून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. 10 रुग्णालये आणि 48 शाळांचेही नुकसान झाले आहे. यूएनच्या म्हणण्यानुसार गाझामधील 3 लाखांहून अधिक लोकांना घरे सोडण्यास भाग पाडले गेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.