बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत अभिनयाची छाप उमटविणारे इरफान खान

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क

न विसरता येणारा अभिनय आणि डायलॉग नेहमीच प्रेक्षकांच्या ओठांवर राहतील असे असत. आज दिवंगत अभिनेते इरफान खान (Late actor Irrfan Khan) यांचा ५६ वा जन्मदिवस. आजही इरफान यांच्या आठवणीत त्यांचे चाहते भावुक होतात. अलीकडेच त्यांचा मुलगा बाबिल याने ‘कला’ या नेटफ्लिक्सवरील सिनेमातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले. मात्र वडिलांच्या निधनानंतर आयुष्यात पुढे जाणे त्याच्यासाठी कठीण किती कठीण होते. त्याने या बाबत सांगितले की वडिलांना अचानक गमावल्या नंतर त्याला सावरावला वेळ लागला. बाबिलने म्हणतो कि त्याने सुमारे ४५ दिवस स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते.

इरफान यांना २०१८ साली त्यांच्या कॅन्सरविषयी समजले होते. एक भावुक पोस्ट करत त्यांनी त्यांच्या चाहत्यांना याविषयी माहिती दिली. त्यांच्यावर उपचारही सुरू होते, इरफान यांनी यूकेमध्येही उपचार घेतले. मात्र एप्रिल २०२० मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबिलने सांगितले की, सुरुवातीचे काही दिवस त्याला वडील गेले यावर विश्वासच बसत नव्हता. मात्र, एका आठवड्यानंतर त्याला हे जाणवले. या काळात तो अत्यंत वाईट परस्थितीत पोहोचला. जवळपास दीड महिना स्वत:ला खोलीत कोंडून घेतले होते. कला सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान मुलाखत देताना बाबिल त्याच्या वडिलांच्या निधनाविषयी बोलला.

Leave A Reply

Your email address will not be published.