द्वारका नगर येथील रहिवास्यांचा पुढाकार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

द्वारका नगर निमखेडी शिवार येथे NH ६ या ठिकाणी गतिरोधक (Deadlock) टाकणे अशी विनंती जिल्हाधिकारी अमन मित्तल तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, NHAI / PWD शाखा,पोलीस आधिक्षक तालुका पोलीसस्टेशन यांना द्वारकानगर वासियांनी केली . राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ जास्त प्रमाणात सुरु असते. त्यामुळे सामान्य नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. अवजड वाहनाच्या रहदारी मुळे अपघात होण्याची शकता वर्तवण्यात आली आहे.

याठिकाणी सतत अपघात होत असतात व बऱ्याच जणांना दुखापती झाल्या असून त्यांना प्राण गमवावे लागले आहे. त्यामळे गतिरोधक टाकणे अत्यंत गरजेचे झाले आहे. द्वारकानगर थांब्याच्या दोन्ही बाजूस भराव करून थांब्याचे रुंदीकरण करावे. जेणे करून प्रवासी व वाहने सुरक्षित उभी राहू शकतील. अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना (Collector)केली अजून निवेदनाची दाखल न घेतल्यास दि. जानेवारी २०२३ रोजी रविवारी सकाळी ठीक १० वाजता राष्ट्रीय महामार्गावर “रास्ता रोको आंदोलन” करण्यात येईल.

निवेदक -विनोद पाटील,स्वप्निल भांडारकर, भरत सूर्यवंशी, श्रीकांत पाटील, सतीश पाटील, सोमनाथ लोखंडे, शांताराम पाटील, रवींद्र पाटील, आशिष पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.