तीन दिवसांपासून वातावरण स्थिर; पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

तापमानात सतत होत असलेले बदलामुळे नागरिक हैराण झाले आहे. त्यात अजून आज रात्री पासून तापनात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमानात तीन दिवसांपासून घट झाल्याचे जाणवत आहे. तापमान पुन्हा २९ अंशसेल्सिअस वर तापमान गेल्याने शनिवारी उन्हाचे चटके जाणवत होते, दरम्यान रविवार पासून किमान तापमान १० अंशांच्या खाली येण्याची शक्यता आहे. रात्री पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मकरसंक्रांतीपर्यंत रात्रीचे तापमान १० अंशाच्या जवळपास स्थिर राहील तर त्यानंतर कमाल तापमान ३२ ते ३३ अंशसेल्सियस वर जाऊ शकते त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री गारठा राहील. येत्या १५ जानेवारीपासून दिवसाचे तापमान ३२ ते ३३ अंशसेल्सियसपुढे जाऊ शकते. त्यामुळे सकाळी ऊन आणि रात्री थंडी राहील. बदलत्या वातावरणामुळे सर्दी,खोकल्याचे प्रमाण वाढतांना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.