IPL च्या ‘या’ संघ मालकावर ईडीची धाड

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

तामिळनाडूतून मोठी बातमी समोर येत आहे. ईडीच्या पथकाने चेन्नईतील इंडिया सिमेंट्सच्या परिसरात छापा टाकला आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे इंडिया सिमेंट्सच्या कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक देखील आहे. इंडिया इंडिया सिमेंट्स ही भारतातील सर्वात मोठ्या सिमेंट कंपन्यांपैकी एक आहे. इंडिया सिमेंट्सचे आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा येथे ७ प्लांट आहेत.

ईडीच्या पथकाकडून इंडिया सिमेंट्सच्या संबंधित कागदपत्रांची चौकशी सुरु आहे. ईडीच पथक चौकशी करण्यासाठी या परिसरात दाखल झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या पथकाने इंडिया सिमेंट्सच्या ठिकाणांवर छापा टाकला आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच पथक एन श्रीनिवान यांचा ठावठिकाणा लपवून त्यांची चौकशी करु शकते असं म्हटलं जात आहे.

CSK चे मालकी हक्क
चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. या संघाचे मालकी हक्क इंडिया सिमेंट्सकडे आहे. चेन्नई सुपर किंग्स संघात एन श्रीनिवास यांची २८.१४ टक्के इतकी हिस्सेदारी आहे. आयपीएल स्पर्धेला २००८ मध्ये चेन्नई प्रारंभ झाला होता. स्पर्धेतील पहिल्याच हंगामात इंडिया सिमेंट्सने चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मालकी हक्क मिळवले होते. त्यांनी २००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज ही फ्रँचायजी ९१ मिलियन डॉलर मोजत खरेदी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.