तारीख ठरली; आयपीएल २०२४ संदर्भात BCCI ने दिली मोठं अपडेट

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारताच्या सध्या वनडे वल्डकपचा फिव्हर जोर धरू लागला आहे. यादरम्यान, बीसीसीआयने अजून एक मोठी घोषणा करत भारतातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आयपीएल २०२४ कडे देखील वेधले आहे.

बीसीसीआयने फ्रेंचायजींना त्यांचे रिलीज आणि रिटेन खेळाडू कोण कोण असतील याची यादी १५ नोव्हेंबर पर्यंत जमा करण्यास सांगितले आहे. आयपीएल २०२४ साठी ट्रेंडिंग विंडो ओपन आहे. मात्र वर्ल्डकप सुरु असल्याने तेथे फार हालचाली होतांना दिसत नाही आहे. आयपीएल २०२४ लिलाव हा एका दिवसात संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच आयपीएलचा लिलाव हा विदेशात देखील होण्याची शक्यता आहे. हा लिलाव १९ डिसेंबरला दुबईत होण्याची शक्यता आहे. आयपीएलचा मेगा लिलाव हा २०२४ ला डिसेंबर महिन्यात होणार आहे.

यंदाचा लिलाव जरी मिनी लिलाव असला तरी खेळाडूंना किती पैसे मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संघांची पर्स आता वाढवली आहे. प्रत्येक संघाच्या पर्समध्ये ५ कोटी रूपयांची वाढ होऊन ती १०० कोटी झाली आहे.

कोणाच्या पर्समध्ये किती रक्कम शिल्लक?

पंजाब किंग्ज – 12.20 कोटी रूपये

मुंबई इंडियन्स – 50 लाख रूपये

सनराईजर्स हैदराबाद – 6.55 कोटी रूपये

गुजरात टायटन्स – 4.45 कोटी रूपये

दिल्ली कॅपिटल्स – 4.45 कोटी रूपये

लखनौ सुपर जायंट्स – 3.55 कोटी रूपये

राजस्थान रॉयल्स – 3.35 कोटी रूपये

रॉयल चॅलेंजर बेंगलोर – 1.75 कोटी रूपये

कोलकाता नाईट राडयर्स – 1.65 कोटी रूपये

चेन्नई सुपर किंग्ज – 1.5 कोटी रूपये

Leave A Reply

Your email address will not be published.