रिषभ पंत IPL 2023 ला मुकणार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय क्रिकेट संघाचे विकेटकिपर (wicket keeper) फलंदाज आणि आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सचा (IPL Franchise Delhi capitals) कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) आयपीएल २०२३ (IPL 2023) अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे बाहेर पडला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांना विचारले असता त्यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. बीसीसीआयच्या (BCCI) अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेट संचालकपदाची (Directorship) जबाबदारी स्वीकारली आहे.

भारताचा ऋषभ पंत गेल्या महिन्यात रस्ता अपघातात जखमी झाल्यामुळे इंडियन प्रीमियर लीग मध्ये ह्या वर्षी खेळी शकणार नाही. अशी माहिती राष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे (National Cricket Board) माजी प्रमुख सौरव गांगुली यांनी केली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांनी कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “ऋषभ पंत आयपीएल २०२३ साठी उपलब्ध होणार नाही. मी दिल्ली कॅपिटल्सच्या संपर्कात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.