लोकशाही न्यूज नेटवर्क
एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याचा प्रकार एरंडोल शहरात उघडकीस आला असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार एरंडोल शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत राहत असून ९ जानेवारी रोजी सायंकाळी अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. सायंकाळी मुलीचे पालक घरी आल्यावर मुलगी घरी नसल्याचे दिसून आले. त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेही मिळून आली नाही. अखेर मंगळवारी १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे.त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गणेश अहिरे करीत आहे.