भूकंपामुळे इंडोनेशिया हादरले; 46 जणांचा मृत्यू, 700 हून अधिक जखमी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

इंडोनेशिया भूकंपाच्या मोठ्या धक्क्याने हादरला आहे. जावा बेटावर सोमवारी झालेल्या भूकंपात तब्बल 46 जणांचा मृत्य़ू झाला असून 700 जण जखमी झाले आहेत.

यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, 5.4-रिश्टर स्केलचा हा भूकंप पश्चिम जावा प्रांतातील सियांजूर भागात होता. सियांजूर जिल्ह्याच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी घरांसह अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाल्य़ाचं म्हटलं आहे.

इंडोनेशियाला पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. इंडोनेशियाच्या जावा बेटावर सोमवारी झालेल्या भूकंपामध्ये 46 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय, तर 700 हून अधिक जखमी झाले आहेत.

सोमवारी सकाळच्या सुमारास इंडोनेशियाचे जावा बेट भूकंपाने हादरले. शुक्रवारीही येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यामुळे लोकांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली. या भूकंपामुळे हजारो घरांचे नुकसान झाले असून आतापर्यंत 46 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळी जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.4 एवढी मापण्यात आली आहे. याआधी शुक्रवारी 6.6 रिश्टर स्केलचा भूकंप येथे झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.