इंडिगो विमानाचं पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लॅन्डिंग; नेमकं काय झालं ?

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

इंडिगो विमानाचं (IndiGo Aircraft) पाकिस्तानातील कराचीमध्ये (Pakistan Karachi)  आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आलं. दोन आठवड्यांत कराचीमध्ये भारतीय विमानाचं हे दुसरं आपत्कालीन लँडिंग आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे विमान शारजाहून हैदराबादला जात होतं. तांत्रिक बिघाडीमुळं विमान उतरवण्यात आलंय. तांत्रिक बिघाडाची माहिती मिळाल्यानंतर, क्रू मेंबर्सनी (Crew members) विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.

प्रवाशांना दुसऱ्या विमानानं हैदराबादला आणलं जाणार आहे. दोन आठवड्यांत कराचीमध्ये भारतीय विमानाचं हे दुसरं आपत्कालीन लँडिंग आहे. इंडिगो एअरलाइन्सने (Indigo Airlines) माहिती दिली की, शारजाह-हैदराबाद (Sharjah-Hyderabad) फ्लाइटच्या पायलटला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली. यानंतर खबरदारी म्हणून विमान कराचीच्या दिशेनं वळवण्यात आलं. सध्या प्रवाशांना हैदराबादला आणण्यासाठी कराचीला जादा विमानाची व्यवस्था करण्यात आलीय.

Leave A Reply

Your email address will not be published.