लोकशाही न्यूज नेटवर्क
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून आलेल्या दहशतवाद्यांनी पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न केला. जिगरबाज भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा हा डाव उधळून लावला. अखनूर सेक्टरमध्ये चार दहशतवाद्यांनी घुसखीरीचा प्रयत्न केला. चवेळी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षादलाच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. एका दहशतवाद्याचा खात्मा केला. त्याचा मृतदेह सीमापार फरफटत नेत इतर तीन साथीदार दहशतवाद्यांनी पळ काढला.
भारतीय लष्कराच्या ‘व्हाइट नाइट कोर’ने एक्स अकाउंटवरुन या घटनेची माहिती दिली. खौर अखनूरच्या आयबी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला आहे. २२ आणि २३ डिसेंबरच्या मध्यरात्री सीमेवर चार दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणाऱ्या उपकरणांच्या माध्यमातून समोर आले.
त्यानंतर भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत गोळीबार केला. त्यात एका दहशतवादी मारला गेला. त्याचा मृतदेह इतर साथीदार दहशतवाद्यांनी सीमापार फरफटत नेल्याचे दिसून आले, अशी माहिती देण्यात आली.