भाजप सहकार आघाडी जिल्हाध्यक्षपदी राकेश फेगडे यांची निवड

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल तालुक्यातील कोरपावली येथील भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व सहकार क्षेत्राच्या चळवळीत दांडगा अनुभव असलेले यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांची पक्षाच्या सहकार आघाडीच्या जळगाव जिल्हा पुर्व विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

राकेश वसंत फेगडे यांची ही निवड भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हा पुर्व अध्यश अमोल हरिभाऊ जावळे यांनी केली आहे. या नियुक्तीचे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीषभाऊ महाजन, पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, महाराष्ट्र प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे, जळगाव चे खासदार उन्मेश पाटील, जळगावचे आमदार सुरेश भोळे, भुसावळचे आमदार संजय सावकारे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी, जेष्ठ पदाधिकारी हिरालाल चौधरी, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांच्यासह पक्षातील विविध पदाधिकारी यांनी राकेश फेगडे यांचे स्वागत केले आहे. तसेच यावल तालुक्यांमध्ये सुद्धा त्यांचे स्वागत केले जात आहे

Leave A Reply

Your email address will not be published.