सचिनचा रेकॉर्ड विराट कोहली मोडणार…!

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

भारत (India) आणि ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या सीरीजमधील पहिला सामना 9 फेब्रुवारीला नागपूरमध्ये (Nagpur) खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा अव्वल फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आपल्या नावे एक मोठाकॉर्ड करु शकतो. सध्या क्रिकेट खेळणाऱ्या प्लेयर्सपैकी एकही फलंदाजाने आज पर्यंत हा रेकॉर्ड केलेला नाही. विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 64 धावा केल्या, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25,000 धावा पूर्ण करणारा तो क्रिकेट विश्वातील पहिला एक्टिव बॅट्समन ठरू शकतो.

विराट कोहलीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात फक्त 64 धावा करण्याची गरज आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट इतिहासात सचिन तेंडुलकरनंतर (Sachin Tendulkar) मोठं यश मिळवणारा तो दुसरा फलंदाज ठरेल. सध्या क्रिकेट खेळणाऱ्या प्लेयर्सपैकी विराट कोहली असा रेकॉर्ड करणारा पहिला फलंदाज असेल. विराट कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24,396 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक 34357 धावांची नोंद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.