पावसाळ्यात आईस्क्रीम खाताय ? अनेक समस्यांना देताय आमंत्रण

0

 लोकशाही न्यूज नेटवर्क 

पावसाळ्यात अनेक रोगराई डोकं वर काढत असतात. पावसाळा सुरू झाला की सगळीकडे रोगराई पसरायला सुरूवात होते. मात्र पावसाचा आनंद घेतांना रोगराईपासून स्वतःचं संरक्षण करणं गरजेचं आहे. तसेच पावसाळ्यात आहाराकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे. उघड्यावरचे अन्नपदार्थ तर टाळलेच पाहिजे. इतकेच नाही तर पावसाळ्यात अनेकांना आईस्क्रीम खाण्याचा मोह टाळला जात नाही. म्हणून तुम्हीही पावसाळ्यात आईस्क्रीम खात असाल तर सावधान व्हा.. कारण तुम्ही अनेक समस्यांना आमंत्रण देताय.. चला तर मग जाणून घेऊया अधिक माहिती..

छाती जड होणे : पावसाळ्यात वातावरणात गारवा वाढतो. या काळात असे पदार्थ खाणे टाळावे. ज्यामुळे शरीराला ऊब मिळते. आईस्क्रीमचे सेवन केल्याने सर्दी, खोकला, छाती जड होणे यासारख्या समस्या उद्भवतात. पावसाळ्यात तुम्हाला गोड खायचे असेल तर तुम्ही इतर कोणतीही मिठाई योग्य प्रमाणात खाऊ शकता.

घसा खराब होणे : घशासाठी आइस्क्रीमचे सेवन कोणत्याही ऋतूमध्ये चांगले मानले जात नाही. आईस्क्रीम खाल्यामुळे घासा बसतो किंवा खराब होतो. आपला आवाज बदलालतो. त्यामुळे आवाजाचे काम करणाऱ्या लोकांनी आईस्क्रीम कोणत्याही ऋतूत खाऊ नये.

वजन वाढू शकते : आईस्क्रीममध्ये साखर, कॅलरीज, फॅट असते, जे आरोग्यासाठी फायदेशीर नाही. त्यामुळे लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. जर तुम्ही जास्त प्रमाणात आइस्क्रीम खाल्ले तर जास्त कॅलरीज शरीरात जातात, जे वजन वाढवण्याला कारणीभूत ठरतात.

डोकेदुखी होऊ शकते : पावसाळ्यात आईस्क्रीम खाल्याने मेंदू फ्रिज होऊ शकतो आणि मेंदूच्या नसांवर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे तीव्र डोकेदुखी होऊ शकते. ज्या लोकांना सायनसची समस्या आहे त्यांनी पावसाळ्यात आईस्क्रीम खाणे टाळावे.

पचनक्रिया कमकुवत होणे : पावसाळ्यात संसर्ग आणि आजारांचा धोका वाढतो. म्हणूनच आपण अशा पदार्थांचे सेवन करतो ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते पण पावसाळ्यात आईस्क्रीमचे सेवन केल्यास पचनक्रिया कमकुवत होऊ शकते. यामुळे आपली रोगप्रतिकारशक्तीही कमी होते.

साखरेची पातळी वाढू शकते : आईस्क्रीममध्ये भरपूर साखर असते. त्यामुळे आईस्क्रीम खाल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. अशा परिस्थितीत मधुमेहींनी आईस्क्रीमचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.