Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»धक्कादायक; पती पत्नीचा वाद… पत्नी बेशुद्ध झाल्यावर पतीने केले असं काही…
    ताज्या बातम्या

    धक्कादायक; पती पत्नीचा वाद… पत्नी बेशुद्ध झाल्यावर पतीने केले असं काही…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 14, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    पती पत्नी म्हटलं कि भांड्याला भांड लागण साहजिकच आहे. त्यामुळे त्यांच्या वाद होणे, रुसवे फुगवे हेही साहजिकच. मात्र वडाळ्यात अश्याच वादामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रेम विवाह केलेल्या दाम्पत्याचे होत्याचे नव्हत झाल आहे. भांडणादरम्यान पतीनं पत्नीच्या कानशिलात लगावली. त्यामुळे पत्नी खाली पडली. तिची शुद्ध हरपली. काही वेळानं तिला शुद्ध आली. तेव्हा तिला पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. श्रीमुखात लगावल्यानं पत्नीची शुद्ध हरपली. तिची हालचाल जाणवत नसल्यानं पती घाबरला. पतीचा मृत्यू झाल्याचं समजून त्यानं गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    रणजीत राजेश देवेंद्र असं मृत तरुणाचं नाव आहे. तो २२ वर्षांचा होता. देवेंद्र कुरिअर कंपनीत डिलिव्हरी एजंट म्हणून काम करायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र आणि त्याची पत्नी अभिरामी (२०) यांचा प्रेम विवाह होता. त्यांनी कोर्टात लग्न केलं होतं. दोघे वडाळ्यातील आंबेडकर नगरात राहायला होते. तर देवेंद्रचे आई, वडील त्यांच्या जवळच्या परिसरात वास्तव्यास आहेत.

    देवेंद्र आणि अभिरामी यांच्यात वाद सुरू होते. गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं त्यांच्यात भांडणं सुरू होती. त्यामुळे देवेंद्र तणावाखाली होता. रविवारी संध्याकाळी दोघांमध्ये वाद झाला. भांडण विकोपाला गेलं. देवेंद्रनं पत्नीच्या कानशिलात लगावली. ती खाली पडली आणि बराच वेळ उठलीच नाही. काही वेळानं अभिरामी शुद्धीवर आली. तेव्हा तिला देवेंद्र पंख्याला लटकलेल्या स्थितीत दिसला. याची माहिती तिनं जवळच राहणाऱ्या सासू सासऱ्यांना दिली. यानंतर देवेंद्रला सायन रुग्णालयात नेण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

    या प्रकरणी पोलिसांनी अभिरामीचा जबाब नोंदवला. वाद सुरू असताना देवेंद्रनं कानशिलात लगावली. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिला पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला, अशी माहिती पत्नीनं जबाबात दिली, असं पोलिसांनी सांगितलं. परिस्थितीजन्य पुरावे पाहता यात कोणताच घातपात दिसत नाही. त्यामुळे अपघाती मृत्यूची नोंद केली असल्याचं वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर अर्गडे यांनी सांगितलं.

    #crime Love Marriege Mumbai Suicide
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif