नवरा-बायकोच्या भांडणात चक्क विमानाचं उतरवले खाली

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सोशल मीडियावर आपण कायमच अनेक जोडप्यांचे व्हायरल झालेलं व्हिडिओ पाहिले असतील. तसंच तरुण-तरुणी प्रेमासाठी अनेकवेळा टोकाचे पाऊलही उचलण्यास मागेपुढे बघत नाही. मात्र हीच जोडपी जेव्हा विवाह बंधनात अडकतात तेव्हा त्यांच्यात छोट्या छोट्या कारणांवरून खटके उडतात.

आजवर आपण अनेक जोडप्यांचे भररस्त्यात तर कधी ट्रेनमध्ये, बसमध्ये भांडणाचे व्हिडिओ पाहिले आहेत. पण आता सोशल मीडियावर एका जोडप्यांच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात या कल्पसच्या वादामुळे विमान चक्क मध्येच उतरवले गेले आहे.

नक्की हे प्रकरण काय आहे हे सविस्तर पाहुयात…
बुधवारी सकाळी म्युनिचहून बॅबकॉक जाणाऱ्या विमानात एक जर्मन जोडपं प्रवास करत होत. या विमानातील नवरा-बायकोमध्ये काही कारणांवरून वाद सुरु झाला. यात पतीने पत्नीला धमकी दिल्यामुळे महिलेने चक्क पायलटकडेच मदत मागितली.

नवरा-बायको वादामुळे लुफ्थान्सा फ्लाइट क्रमांक LH772ने IGI हे विमान सुरुवातीला पाकिस्तानच्या विमानतळावर उतरवले जाणार होते. पण तिथं उतरवण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे म्युनिचहून उड्डाण केल्यानंतर विमानाला दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवावे लागले. त्यानंतर पतीला विमानातून उतरवण्यात आले. व्हायरल होत असलेल्या या बातमीवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्यात. जोडप्याच्या या कृत्यावर सोशल मीडियावरील नेटकरी संतापले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.