प्रवाशांनो लक्ष द्या ! २४ रेल्वे गाड्या रद्द, ८ गाड्यांच्या मार्गात बदल

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. भुसावळ विभागातून धावणाऱ्या २४ रेल्वे एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर आठ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. भोपाळ विभागातील बुधनी-बरखेरा स्थानक दरम्यान तिसरी लाइन सुरू करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात आल्याने या रेल्वे एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

 

या गाड्या रद्द 

१२१५३ लोकमान्य टिळक टर्मिनस-राणी कमलापती एक्स्प्रेस (७ डिसेंबर रोजी रद्द )

१२१५४ राणी कमलापती-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस (८ डिसेंबर रोजी रद्द)

१२७२० हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस (२७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान रद्द)

१२७१९ जयपूर- हैदराबाद एक्स्प्रेस (२९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबरदरम्यान रद्द)

११०७९ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस (७ डिसेंबर रोजी रद्द)

११०८० गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस (९ डिसेंबर रोजी रद्द)

१२१६१ लोकमान्य टिळक टर्मिनस-आग्रा कँट एक्स्प्रेस (८ डिसेंबर रोजी रद्द)

१२१६२ आग्रा कॅट-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस (९ डिसेंबर रोजी रद्द)

१९४८३ अहमदाबाद-बरौनी एक्स्प्रेस (२७ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर रोजी रद्द)

१९४८४ बरौनी-अहमदाबाद एक्स्प्रेस (२७ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर रोजी रद्द)

१९४३५ अहमदाबाद-आसनसोल एक्स्प्रेस (३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत रद्द)

१९४३६ आसनसोल -अहमदाबाद एक्स्प्रेस (२ डिसेंबर रोजी रद्द)

०१४३१ पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस (८ डिसेंबर रोजी रद्द)

 

या गाड्यांच्या मार्गात बदल

लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी कामायनी एक्सप्रेस, पुणे-लखनौ एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर, बलसाड- कानपूर एक्स्प्रेस, इटारसी, जबलपूर, कटनीमार्गे धावणार आहे. वाराणसी- लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्स्प्रेस, लखनौ-पुणे एक्सप्रेस, गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, कानपूर-बलसाड एक्सप्रेस कटनी, जबलपूर, इटारसीमार्गे धावणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.