चक्क ट्रेनमध्येच उरकलं लग्न, फिल्मी स्टाईल व्हिडीओ व्हायरल

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

अनेक कपल घरच्यांच्या विरोधात पळून जाऊन लग्न करतात, अशा अनेक घटना समोर येतात. मात्र एक अनोखी घटना समोर आलीय. ज्यामध्ये एका कपलने चक्क ट्रेनमध्येच लग्न केलं. या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय.

 

 

व्हायरल व्हिडीओनुसार, ट्रेनमध्ये भरपूर गर्दी आहे. मुलाने मुलीला चालत्या ट्रेनमध्ये सिंदूर भरला. यानंतर मुलीने ट्रेनमध्ये उपस्थित लोकांसमोर त्याला मिठी मारली. नंतर तो मुलगाही तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि मग दोघेही एकमेकांच्या गळ्यात हार घालताना दिसतात. ती मुलगी पुन्हा एकदा त्याला मिठी मारते आणि त्याच्या पाया पडते. त्यांचं लग्न झाल्यावर ट्रेनमध्ये उपस्थितीत लोकही आनंदी होतात.

दरम्यान ही संपूर्ण घटना ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले, जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना आसनसोल ते जसिडीह मार्गादरम्यान घडली आहे, जिथे लोकल ट्रेनमध्ये दोघांनी सर्वांसमोर लग्न केलं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.