हुंडा : शिक्षित आणि सुसंस्कृत समाजाला लागलेली कीड

0

लोकशाही विशेष लेख

 

हुंडा संबंधी बोलायचं किंवा लिहायचं म्हणजे हा असा विषय आहे, ज्यावर सविस्तर लिहिल्यास, थांबणे कठीण आहे. मात्र तरीही हुंड्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलायचे आहे. याद्वारे हुंड्यासंबंधित काही महत्त्वाची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया…

आपण पुरुष प्रधान संस्कृतीत असलो तरी महिला ही पुरुषांच्या बाबतीत काही कमी नाही, कमावण्याची जबाबदारी माणसावर आहे, तसेच काही वेळा स्त्रियांवर पण असते, पण तरी सुद्धा आजही अनेक पुरुष आपले पुरुषत्व पणाला लावतात आणि सासरच्यांकडून हुंडा मागतात ही त्यांची सवय मुळातच चुकीची व लालसेची आहे, आपण या समाजात राहत असताना, वावरताना खूप काही शिकतो, चांगले ही शिकतो वाईट सुद्धा शिकतो परंतु आपण काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे या समाजातील प्रत्येक घटकाने आपले आपण ठरवायचं असते.

खर तर हुंडा मागणी करणे ही पुरुषत्वाचे लक्षण तर मुळीच नाही जर ईश्वराने आपल्याला कमण्याची व कष्ट करून खाणे व खाऊ घालणेची हिम्मत दिली आहे. कष्टासाठी शरीर दिलेले आहे तर हुंड्याची मागणी करून स्वत:ला भिकारी असल्याचे का जाहीर करतात. हूंड्यासाठी मागणी करून अपंगत्वासारखे का वागतो तसेच अशा हुंडारुपी भिक मागणाऱ्या लोकांच्या हाती ते पालक आपली मुलगी कशी देतात बर, ही आश्चर्याची बाब आहे. सदर बाब कडू आहे पण सत्य आहे. पण जेव्हा आपण या एका हुंडारुपी राक्षसाच्या दुष्परीणामा बाबतीत विचार करू, त्याच्या हानीचा विचार करू तेव्हा आपण सुसंस्कृतपणे ठरवले तर हुंड्यासारखा हा शाप टाळू
शकतो.

या राक्षसरूपी हुंड्यामुळे समाजात अनेक असे संसार उध्वस्त होत आहे, अनेक असे बळी जात आहेत बऱ्याच वधुंना, वधू-पित्याना हुंडा व त्याच्या कर्जापोटी आत्महत्या करावी लागत आहे. हुंडा बळीचे शिकार व्हावे लागत आहे.

आता साधारणतः प्रश्न असा पडतो की चूक कोणाची हुंडा मागणार्याची(भिकारी) की देणाऱ्यांची(दानशूर) या यक्ष प्रश्नाचं उत्तर माझ्या मते तरी एकच की चूक त्यावेळी निर्माण होणाऱ्या परिस्थीतीची आहे, यावर एकच की अशी परिस्थिती जर का समाजात निर्माण होऊ द्यायची नसेल तर वर-वधू मंडळी कडून कोणत्याही प्रकारे हुंड्या विषयी बोलले जाऊ नये.

हुंडा हा विषय गौण ठेऊन फक्त रीतिरिवाज प्रमाणे लग्न सोहळा लावावा व विधीप्रमाणे लग्न पार व्हावे अशी भावना असा विचार मनात ठेऊन दोन्ही मंडळींनी मोठे मन ठेवने गरजेचे झाले आहे.समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून, संघटनांकडून याबाबत समुपदेशन झाले पाहिजे, समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे.

समाजात वावरताना आपण शिक्षण घेऊन सुशिक्षित होऊन जगण्यापेक्षा सुसंस्कारित होऊन जगले पाहिजे म्हणजे ही हुंडा मागणी किंवा हुंडादेणगी हा प्रश्नच निर्माण होणार नाही. लग्न पद्धती ही साध्या पद्धतीची असायला हवी जेणे करून लग्नावर होणारा अवाजवी खर्च होणार नाही. सद्य स्थितीला लग्न करणे खूप कठीण व खर्चिक झाले आहे त्या सर्वांची यादी करणे शक्य नाही. लग्नं हुंड्यामुळे लग्न महाग झाल्यामुळे व मुलीचे वय वाढत जात असल्याने गरीब मुली घरीच स्थायिक होतात, फक्त त्यांच्या आई-वडिलांकडे लग्न करून हुंडा द्यायला पैसे नाहीत. परिणामी, अशी प्रकरणे सामान्य झालीत. परिस्थिती व्यभिचारते कडे जाऊ नये म्हणून आपण सदर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

शासनाने निश्चित केलेल्या वयाच्या नियमानुसार मर्यादित वेळेतच व संस्कृतीला साजेल असेच लग्न सोहळे व्हायला हवे. आज समाजातील सर्व तरुण मुली कुठेतरी या हुंडा पद्धतीला बळी पडत आहेत आणि त्यात ते लोकही तितकेच जबाबदार आहेत, जे समाजात जबाबदार प्रतिष्ठित व्यक्ती असूनही अशा गोष्टींचा निषेध करीत नाही किंवा अशा गोष्टींना योग्य त्यावेळी आळा घालत नाही.

हुंडा पद्धतीमुळे वधू पित्याला नको तसे कमावण्यास भाग पाडले जाते. बाप आपल्या मुलींच्या लग्नासाठी आयुष्यभर कष्ट करतो, विवेक पणाला लावून परमेश्वराची आज्ञा मोडतो. लाचखोरी, व्याजाने कर्ज घेऊन हुंडा देणे फक्त त्याला आपल्या मुलीचे लग्न लावायचे आहे म्हणून, आपल्या बेअब्रू आणि भिकारचोट जावयाची झोळी भरायची आहे, हाच त्याच्या मनात विचार असतो. यामुळे वडील आपली सर्व बचत मुलीच्या लग्नासाठी खर्च करतात. भावाचे लग्न अवघड होते परिणामी अशावेळी हीच वेळ याच वधू मुलीचे वडीलाला मुलाचं लग्न करणं कठीण होऊन जातं आणि मग मुलगा सासरच्यांकडून हुंडा मागायला भाग पाडतो. अर्थातच हे चक्र सुरू होऊन समाजात हा प्रवास अविरत चालत असतो व चालत आहे हे बंद होणे गरजेचे आहे.

शिक्षित आणि सुसंस्कारित समाजात या हुंड्यामुळे अनेकदा आपण आत्महत्या ही सर्रास होतानाचे ऐकून आहे. मुलींना गर्भातच मारले जाते. (गर्भपात/स्त्री भ्रूणहत्या) लोक अनेकदा गर्भातच मुलगा आहे की मुलगी हे शोधून काढतात आणि गर्भातच मारून टाकतात, कारण ती मोठी झाल्यावर तिच्या लग्नाचा आणि हुंडा खर्च पालकांना सहन होत नाही. त्यामुळे जगात येण्यापूर्वीच त्याचे अस्तित्व संपवले जाण्याचा प्रयत्न होतो. अप्रत्यक्षपणे ते भ्रूण सुद्धा देवाला विचारत असेल की मला कोणत्या गुन्ह्यासाठी मारले गेले. एवढं सगळ घडण्याच एक कारण हुंडाही आहे.

किती दुःख होते ना, हुंडा मागितल्यावर गरीब वधू मंडळींना आपण हुंडा मागणी करून असे का जाहीर करतो की “माझा माझ्या परमेश्वरावर विश्वास नाही, माझा माझ्या पुरुषत्वावर विश्वास नाही की मी कष्ट करून माझ्या बायको आणि मुलांचे पोट भरू शकत नाही. त्यामुळे मला माझ्या सासरच्यांकडून हुंड्याच्या रूपात भीक मागावी लागते. आणि वधु पिता, माझी मुलगी माझ्यावर ओझं आहे, म्हणून तिचं घर वसवायला मला लाच द्यावी लागेल, नको ते कर्ज घ्यावे लागते असा विचार करून ते पालक हुंडा का देतात? आपण कोणत्या संस्काराचे पालन करतोय. प्रत्येक धर्मामध्ये दया करण्याचा आदेश आहे, जो मुलीला दया मिळण्याचा अधिकार आहे.

निसर्गाचा पवित्र आदेश(नियम) का विसरला आहे समाजातील हा घटक? सासरे भेटवस्तू देऊ शकतात का? आता प्रश्न येतो की सासरे श्रीमंत असतील आणि त्यांना त्यांच्या सुनेला किंवा जावयांना काही भेटवस्तू द्यायची असतील तर ती घेणे योग्य आहे का, तथापि, यात काही नुकसान नाही, परंतु ते न घेण्याचा प्रयत्न उत्तम, ही एक संस्कृती आणि क्रांती बनेल. आणि जर आपण हुंड्याची मागणी करत असणार त्याशिवाय लग्न मंडपात बसत नसणार तर हे ती भेटवस्तू नाही तर तो हुंडा बनेल, आणि हे एक विकृतीचे लक्षण ठरणार. आणि अश्या प्रकारची विकृती ही संस्कृतीला मारक ठरेल.

खरं तर आजच्या शिक्षित आणि संस्कारित तरुणांना हुंड्यासारख्या शापाच्या विरोधात उभे राहण्याची आज गरज आहे शिवाय प्रत्येकाने सुरुवात स्वतः पासून करण्याची नितांत गरज आहे. कारण आज हुंडा हा विषय समाजात राक्षसारखा पसरलेला आहे. त्यामुळे विवाह करणे कठीण झाले अर्थातच आपली तरुणाई व्यभिचाराकडे वळली आहे अगदी आपल्या आई-वडिलांची इज्जत पणाला लावली जात आहे.

कोणाचेही नुकसान करण्याचा माझा हेतू नाही. या लेखातून फक्त एवढच की विवाह सोपा व्हावा हुंडा बंदी व्हावी व या विषयी जागरूकता यावी असा प्रयत्न आहे. आज आपल्या तरुणांनी ठरवले की काहीही झाले तरी मी हुंडा घेणार नाही, तर हीच खऱ्या अर्थी क्रांती होईल. हीच आपली संस्कृती आहे. आणि मी त्या सर्व पालकांना विनंती करू इच्छितो की, “त्यांनी आपल्या मुला मुलींना धार्मिक, संसारिक तसेच सांस्कृतीक शिक्षणाने सुसज्ज करावे, त्यांना इतके संस्कारित बनवावे की वर-वधू यांना एकमेकांनाच आपण एकमेकांचे हुंडे आहोत ही विचारधारा झाली पाहिजे. म्हणून आपण साध्या आणि रीतिरिवाज विधिनुसार लग्न सोहळ्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, ते अगदी सामान्य केले पाहिजे आणि हुंड्याच्या शापापासून स्वतःला आणि आपल्या नातेवाईकांना जास्तीत जास्त वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आपण विवाह सोपा आणि साध्या पद्धतीने करण्याची प्रेरणा आपण घेतली पाहिजे. आपण सर्व गैर-सांस्कृतिक विधींपासून दूर राहण्याचे प्रयत्न समाजातून होऊन याविषयी जन जागृती होण्याची नितांत गरज आहे.

इकबाल पिंजारी
लोकशाही ऐनपूर प्रतिनिधी
मो क्र : 9881969679

Leave A Reply

Your email address will not be published.