मयत व्यक्तीचे पैसे केले परत… वाकोदच्या तरूणाचा प्रामाणिकपणा…

0

 

वाकोद, लोकशाही न्यूज नेटवर्क;

वाकोद येथील दत्तात्रय किसन गुजर यांचे गुरूवार रोजी अकस्मात निधन झाले. वाकोद येथील स्व राणीदानजी जैन व कांताबाई जैन उच्च माध्यमिक शाळेत दत्तात्रय गुजर हे शिपाई पदावर काम करून सेवानिवृत्त झालेले होते. दत्तात्रय गुजर हे शिपाई पदावर असल्याने विद्यार्थी त्यांना आप्पा म्हणून बोलायचे, त्यामुळे दत्तात्रय गुजर हे सर्वाचे आप्पा होते.

आप्पा दोन दिवसापुर्वी वाकोद येथील सोनाई ऑफसेट वर आपल्या बॅक खात्यात 10,000 रू जमा करण्यासाठी गेले असता, बँकेचे पास बुक घरी विसरले. त्यांनी सोनाई ऑफसेट संचालक राहुल वानखेड़े या तरूणाकडे पैसे देऊन, पासबुक घेऊन आल्यावर रक्कम टाकून दे असं सांगून गेले, मात्र ते पुन्हा परत आलेच नाही. दोन दिवसांनी राहुल वानखेड़े यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून आप्पाच्या निधनाची बातमी कळाली. त्यांनतर राहुलने सुध्दा सोशल मिडियाच्या माध्यमातून आप्पानी आपल्याकडे 10,000 रुपये जमा करून गेल्याची माहिती देऊन नातेवाईकांनी ती संपर्क करून घेऊन जाण्याची विनंती केली. राहूल आणि दत्तात्रय गुजर (आप्पा) यांच्यातील झालेल्या व्यवहाराची कोणाला ही माहिती नव्हती. तरीही राहुल ने आपला प्रामाणिक पणा दाखवून रक्कम परत देण्याचे आवाहन करून ते आप्पाच्या कुंटुबाला परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे सोशल मिडिया वर आणि प्रत्येक्ष भेटून अनेकांनी राहुलचे कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.