दिवाळीत बनवा घरीच आयुर्वेदिक उटणे, त्वचेसह आरोग्यालाही फायदे

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोरोना संकटानंतर यंदाचा दिवाळी सण अगदी धामधूममध्ये  साजरा केला होणार आहे. दिवाळीत उटणे लावून आंघोळ करण्याला विशेष महत्त्व आहे. दिवाळी उटणे लावून अभ्यंग स्नान करतात. दिवाळी आली की बाजारात मोठ्या प्रमाणात उटणे उपलब्ध होते. परंतु यातील काही उटण्यांमध्ये केमिकल्स असल्याने त्वचेला देखील हानी होवू शकते.  म्हणून घरीच आयुर्वेदिक उटणे तयार केल्यास ते अधिक फायदेशीर ठरू शकते.

उटणे हे आयुर्वेदीक असल्याने त्यात वापरले जाणाऱ्या घटकांमुळे ते त्वचेसाठी अतिशय लाभदायक ठरते. उटणे तयार करण्यासाठी वेगवेगळे आयुर्वेदिक घटक आणि सुगंधी तेलाचा वापर केला जातो. यामुळे त्वचा ताजीतवाणी आणि चमकदार बनते.

तसेच उटणे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य देखील सहज घरात उपलब्ध असते. सुगंधी उटणे तयार करण्यासाठी दूध, बेसन पावडर, हळद, क्रिम, लिंबाचा रस, तिळ आणि गुलाब जल वापरले जाते. यात अनेक जण आणखी काही वेगवेगळ्या घटकांचा वापर करतात. यामुळे ते त्वचेसाठी आणखी लाभदायक बनते. हे सर्व घटक बारिक करून त्यांची पेस्ट तयार केली जाते आणि ती आंगावर लावून आंघोळ केली जाते. यामुळे त्वचा मऊ आणि ताजी बनते.

 उटणे लावण्याचे फायदे

उटणे लावल्याने अनेक फायदे होतात. आयुर्वेदानुसार प्रत्येकाने शरीरातील दोषांचा विचार करून उटण्याचा वापर करावा. शरीरातील दोष लक्षात घेऊन तयार केलेले उटणे त्वचेची पीएच लेव्हल संतुलीत ठेवण्यास मदत करते.

– वात दोष असलेल्या व्यक्तीसाठी तयार केलेले उटणे त्वचेला पोषण देते आणि सामान्य तापमानावरच तुम्ही ते वापरू शकता. हे उटण तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास असल्यास देखील उपयुक्त ठरते.

– पित्त दोष असणाऱ्यांसाठी तयार करण्यात येणारे उटणे हे थंड तापमाणात लावावे. हे उटणे शरीरातील उष्णता बाहेर काढून टाकण्यास उपयुक्त ठरते. तसेच त्वचेवर मुरुम किंवा पुरळ असतील तर ते दूर करण्यासाठी देखील हे उटणे अतिशय उपयुक्त असते.

– कफ दोष असणाऱ्या व्यक्तिसाठी तयार केलेले उटण्यात गरम तेल घालून मिक्स करावे. हे उटणे शरीरातील कफसारख्या समस्या दूर करते आणि शरीरातील सर्वात आवश्यक लिक्विडचा प्रवाह सामान्य करण्यास मदत करते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.