बापरे.. रुग्णाला प्लेटलेट्स ऐवजी दिला मोसंबी ज्यूस; रुग्णाचा मृत्यू

0

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराजमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका रुग्णालयात डेंग्यूच्या (dengue) रुग्णाला प्लेटलेट्सऐवजी मोसंबीचा रस (Sweet lemon) दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवारी हे रुग्णालयाला (Hospital) टाळं ठोकण्यात आलं आहे. रुग्णालयात प्लेटलेट्सऐवजी (platelets) मोसंबीचा ज्यूस डेंग्यूच्या रुग्णाला दिल्याने खळबळ उडाली आहे.

प्रदीप पांडे या रुग्णाला प्लेटलेट्सऐवजी मोसंबीचा रस (Sweet lemon) दिल्याने त्याची प्रकृती बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आणि रुग्णालय सील करण्यात आलं आहे.

दरम्यान अधिकाऱ्यांनी सांगितले की, रुग्ण प्रदीप पांडेची प्रकृती खालावल्यानंतर त्याला शहरातील दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. मात्र या घटनेसंदर्भात स्थानिक पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. खासगी रुग्णालयाच्या मालकाने दावा केला की प्लेटलेट्स दुसर्‍या वैद्यकीय केंद्रातून आणले होते आणि प्लेटलेट्सचे तीन युनिट चढवल्यानंतर रुग्णाला त्रास होऊ लागला.

एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (सीएमओ) निर्देशानुसार रुग्णालय सील करण्यात आले असून रुग्णाच्या नमुन्याची चाचणी होईपर्यंत रुग्णालय बंद ठेवण्यात आलं आहे. नमुन्याची चाचणी कोण करणार असे विचारले असता, पोलीस औषध निरीक्षकाकडून त्याची चाचणी घेतील असे त्यांनी सांगितले. मात्र, या घटनेसंदर्भात धूमगंज पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

धूमनगंज रुग्णालयाचे मालक सौरभ मिश्रा यांनी सांगितले की, प्रदीप पांडे यांना डेंग्यू झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाच्या प्लेटलेट्सची पातळी 17,000 पर्यंत खाली आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना प्लेटलेट्स आणण्यास सांगण्यात आले. रूग्णाच्या नातेवाईकांनी राणी नेहरू (SRN) रूग्णालयातून पाच युनिट प्लेटलेट्स आणल्या होत्या, परंतु तीन युनिट प्लेटलेट्स चढवल्यानंतर रूग्णाला त्रास झाल्याने डॉक्टरांनी प्लेटलेट्स बंद केल्या. रुग्णालयात प्लेटलेट्सची चाचणी करण्याची सुविधा नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.