जळगाव ;-ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमी जळगाव व हॉकी जळगांव संघटनेचा खेळाडू तथा नूतन मराठा कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी वाणिज्य शाखेतील विद्यार्थी कृष्णा विट्ठल राठोड याची १७ वर्षाआतील शालेय राष्ट्रीय हॉकी स्पर्धे साठी महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झालेली आहे. .
कृष्णा राठोडला प्राचार्य डॉक्टर एल पी देशमुख सह राज्य क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर, प्रशिक्षक सय्यद लियाकत अली, सत्यनारायन पवार व मजाज खान यांचे मार्गदर्शन लाभले.
त्याच्या निवडीबद्दल हॉकी महाराष्ट्र च्या उपाध्यक्ष प्रा डॉ अनिता कोल्हे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ व क्रीडा साहित्य देऊन हॉकीच्या क्रीडांगणावर हॉकी जळगाव व इतर खेळाडू समक्ष सत्कार केला यावेळी हॉकी जळगाव चे सचिव फारुक शेख,राष्ट्रीय पोलीस खेळाडू सैयद रज्जाक, मनोज सुरवाडे, विकार शेख,इरफान शेख, सत्यनारायण पवार, मजाझ शेख व दिवेश चौधरी आदी उपस्थित होते